नागपूर : कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना शासनाकडून ५ लाख रुपयाची मदत मुदत ठेव प्रमाणपत्राच्या स्वरुपात दिल्या जाते. त्यातून अनाथ बालकांचे संगोपन व शिक्षणाची जबाबदारी पार पाडल्या जाते. दोन्ही पालक गमावलेल्या जिल्ह्यातील ५२ अनाथ बालकांना मदत मंजूर करण्यात आली असून येत्या २३ ऑक्टोबरला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याहस्ते मुदतठेव प्रमाणपत्र वितरित करण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी विमला आर. यांनी आज दिली.
जिल्हा कृतीदलाच्या कामाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी आज घेतला. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अपर्णा कोल्हे, पोलिस उपअधीक्षक संजय पुरंदरे, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष राजीव थोरात, महापालिकेचे डी. एम. उमरेडकर, सी. एम. बोंडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक प्रकाश कांचनवार तसेच जिल्हा कृतीदलाचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यात कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या ७१ आहे. त्यापैकी ६९ बालकांचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आणि संबंधित लाभार्थी यांचे संयुक्त बँक खाते उघडण्यात आले आहे. दोन्ही पालक गमावलेल्या ५८ बालकांची केंद्र शासनाच्या पी. एम. केअर पोर्टल या संकेतस्थळावर नोंदणी झाली असून ४८ बालकांना बाल कल्याण समितीची मान्यता देण्यात आली आहे.
जिल्हा निबंधक आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून मार्गदर्शन मिळवून जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने बालकांच्या संपत्तीची नोंदणी करावी. अनाथ बालकांकडून कोणत्याही शाळेने शुल्क घेऊ नये, यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व शाळांना सूचना द्याव्यात, असे त्यांनी सांगितले.
अनाथ झालेल्या बालकांना महानगरपालिकेकडून तीन टक्के मदत निधी योजनेतून उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या महिला व बालविकास विभागाने तत्काळ कार्यवाही करावी. कोरोनामुळे पतीचे निधन झाल्याने विधवा झालेल्या महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे, म्हणून कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.