Nagpur Police Commissioner Amitesh Kumar infected with corona 
नागपूर

ब्रेकिंग : नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना कोरोनाची लागण

अनिल कांबळे

नागपूर : शहर पोलिस दलाचे प्रमुख पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना कोरोनाची लागन झाली आहे. त्यांनी स्वतःला गृहवीलगीकरणात ठेवले आहे. तसेच कळत-नकळत संपर्कात आलेल्या पोलिस अधिकारी आणि नागरिकांना स्वतःची कोरोना चाचणी करून आरोग्य सुरक्षेचा सल्ला दिला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना गेल्या तीन दिवसांपूर्वी कोरोनाचे सौम्य लक्षण आढळून आले. त्यामुळे त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना चाचणी करून घेतली. चाचणीत पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी स्वतःला नियमानुसार गृहवीलगीकरणात ठेवले आहे.

अमितेश कुमार यांनी नागपूर आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ‘फील्ड’वर काम करण्याचा धडाका सुरू केला होता. तसेच पोलिस अधिकारी आणि नागरिकांच्या बैठका घेतल्या होत्या.

सध्या त्यांची प्रकृती चांगली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते उपचार घेत आहेत. यापूर्वी पोलिस दलातील पोलिस सहआयुक्त डॉ. नीलेश भरणे तसेच माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते लवकर बरेसुद्धा झाले होते. सध्या पोलिस आयुक्त घरी राहून कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde:'विधान परिषदेत शशिकांत शिंदेंचा पेन ड्राइव्ह बॉम्ब'; कोरेगावच्या पोलिस अधिकाऱ्याची संभाषण क्लिपने उडाली खळबळ..

Mumbai: हजारो कुटुंबांना दिलासा देणारा निर्णय! अवाजवी मेंटेनन्स आणि वाढीव वीजबिलावर लगाम लागणार; सरकारची मोठी घोषणा

Sydney Shooting : ऑस्ट्रेलियातील सिडनीत दहशतवादी हल्ला? दोन अज्ञातांकडून अंदाधुंद गोळीबार; १० जणांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update: ओबीसी आंदोलक अँड.मंगेश ससाने यांच्या गाडीवर हल्ला, अज्ञातांकडून दगडफेक

Crime: आधी अमानुष मारहाण; नंतर जीवे मारण्याची धमकी, शिक्षकाचं ७ वीच्या विद्यार्थिनीसोबत धक्कादायक कृत्य, कारण काय?

SCROLL FOR NEXT