crime case
crime case sakal
नागपूर

नागपूर : धाड पडताच जुगाऱ्याची पहिल्या माळ्यावरून उडी!

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जुगार अड्ड्यावर छापा टाकला असताना, त्यात अटक केलेल्या ५५ वर्षीय आरोपीने लघुशंका आल्‍याचे सांगत पहिल्या माळ्यावरुन उडी टाकली. गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणाने परिसरात एकच खळबळ उडाली.

मूलचंद बिनेकर (वय ५५ रा. लालगंज, खैरीपुरा) असे मृत आरोपीचे नाव आहे. आज सांयकाळच्या सुमारास मूलचंद सावजी भोजनालय येथील वरच्या माळ्यावर जुगार सुरू असल्याची माहिती पाचपावली पोलिसांनी मिळाली. यावेळी खैरीपुऱ्यात पोलिस ताफ्यासह आले. यावेळी त्यांनी पहिल्या माळ्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. तसेच चार ते पाच आरोपींना अटक केली. दरम्यान मूलचंद बिनेकर यांनी लघुशंका आल्याचे सांगितले. त्यामुळे त्या माळ्यावर असलेल्या टॉयलेटमध्ये पोलिसांसह ते गेले. यावेळी पोलिस सोबत असताना मूलचंद बिनेकर याने हात झटकत थेट पहिल्या माळ्याच्या गॅलरीतून उडी टाकली.

अचानक झालेल्या या घटनेने अनेकांना धक्काच बसला. पोलिस धावत खाली आले. यावेळी मुलचंदला डोक्याला व हातापायाला जबर दुखापत झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला तातडीने उचलून नजीकच्या समर्पण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तो प्रतिसाद देत नसल्याने त्याची प्रकृती खालावली. यावेळी त्याला न्यू एरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केल्याचे समजते.

वर सावजी, खाली अड्डा

खैरीपुऱ्यात राहणाऱ्या बिनेकर परिवार हा जुगारअड्डा चालविण्याचा व्यवसाय करीत होता. घराच्या खाली मूलचंद सावजी भोजनालय चालवायचा आणि वरच्या माळ्यावर जुगार अड्डा चालवीत होता.

पुतण्याचाही जुगाराच्या वादातून खून

दोन वर्षांपूर्वी २७ सप्टेंबर २०२० ला बोले पेट्रोल पंप चौकात बुलेटवरुन येत काही तरुणांनी सिनेस्टाईल भरचौकात कारमध्ये बसलेल्या कुख्यात बाल्या बिनेकरची हत्या केली होती. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याने ती सर्वत्र व्हायरल झाली होती. त्यामुळे शहरात एकच खळबळ माजली होती. बाल्या मुलचंदचा पुतण्या असून तोही जुगार अड्डा चालवायचा. त्यातूनच त्याचा खून झाला होता हे विशेष.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक-चावलाची भेदक गोलंदाजी, पण हेड- कमिन्सच्या फटकेबाजीमुळे हैदराबादचे मुंबईसमोर 174 धावांचे लक्ष्य

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT