Nagpur Head Constable  Esakal
नागपूर

Nagpur Police: देशभर फिरून घेतला ६४ बेपत्ता व्यक्तींचा शोध, खाकीतल्या देवमाणसामुळे कुटुंबांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

जिवाची पर्वा न करता बेपत्ता झालेल्यांचा शोध घेणारा खाकीतला देवमाणूस म्हणजे शांतिनगर पोलिस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल सुधीर खुबाळकर.

सकाळ डिजिटल टीम

Police Head Constable Sudhir Khubalkar: जिवाची पर्वा न करता बेपत्ता झालेल्यांचा शोध घेणारा खाकीतला देवमाणूस म्हणजे शांतिनगर पोलिस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल सुधीर खुबाळकर. जगाच्या कानाकोपऱ्यात फिरून ११ महिन्यांत ६४ बेपत्ता व्यक्तींचा शोध त्यांनी घेतला. यामुळे उदास झालेल्या अनेक कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर नव्याने हसू फुलले.

खुबाळकर बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी देशभरात स्वखर्चाने फिरले. या यादीत बहुतांश महिला होत्या. त्यांच्या अथक प्रयत्नांतून ११ महिन्यांत त्यांनी ६४ बेपत्ता महिला, मुली आणि इतरांचा शोध घेतला. या विलक्षण कामगिरीने शहराचे सर्वोच्च पोलिस, रविंद्रकुमार सिंगल यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्या कर्तव्यदक्षपणाची दखल घेत सिंगल यांनी त्यांचा सत्कार केला आहे.

रेल्वेच्या जनरल डब्यात कधी गर्दीत उभे राहात तर कधी खाली बसून ते बेपत्ता नागरिकांचा शोध घेत होते. यावर्षी आठ महिला बेपत्ता झाल्या होत्या. त्यातील सात जणांना शोधण्यात त्यांना यश आले. १८ ते ८० वयोगटातील या महिलांचा शोध आग्रा, गाझियाबाद, प्रयागराज, उज्जैन या रख्या शहरात लागला. लोकेशन आणि कॉल ट्रेस करून बेपत्ता मुलामुलींचा शोध त्यांनी घेतला. इंटेलिजन्स विभागाची त्यांना दत झाली. कामगिरीनंतर ''खाकीतला देवमाणूस'' म्हणत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

एकदा मी जनरल डब्यातून रेल्वे प्रवास करत असताना कचाकच भरलेल्या रेल्वेत घरातून पळून आलेली एक मुलगी तिच्या मैत्रिणीसह प्रवास करत होती. त्यांच्या कडे खायला प्यायला पैसे नव्हते. मी स्वत:च्या पैशातून त्यांना जेवण घेऊन दिले. त्यानंतर जवळ मोजकेच पैसे असल्याने मी मिळेल तो स्वस्त नाश्ता करून यावेळी पोटाची भूक भागविली.- सुधीर खुबाळकर, हेडकॉन्स्टेबल (शांतिनगर पोलिस स्टेशन)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Census 2026 : राज्यात १ मे पासून जनगणना, विचारले जाणार 'हे' प्रश्न; चुकीची माहिती दिल्यास होणार तब्बल 'इतका' दंड

Latest Marathi News Live Update : शिरपूरमध्ये विद्युत तारांमुळे आग! एक एकरातील बांबू जळून खाक, शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

गरोदर असूनही ‘राका’मध्ये दिसणार दीपिका पादुकोण करणार अ‍ॅक्शन सीन ! अभिनेत्रीची विशेष मेहनत

‘मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया’मध्ये मराठमोळ्या श्वेता साकोडेची दमदार एन्ट्री; महाराष्ट्रीयन पदार्थांनी जिंकली परीक्षकांची मनं

Management Education: मॅनेजमेंट शिक्षणातील 'जेंडर गॅप': महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी बिझनेस स्कूल्स उचलत आहेत मोठी पावले

SCROLL FOR NEXT