नागपूर

Nagpur: पोलिसांच्या कार्यक्रमात पोलीस उपाशी! ढिसाळ नियोजन, संगीतमय कार्यक्रमात स्वत: करावी लागली जेवणाची सोय

सकाळ डिजिटल टीम

Nagpur News: नागपूर शहर पोलिसांच्या वतीने अधिवेशनात बाहेरून आलेले पोलिस आणि शहर पोलिस यांच्यासाठी आयोजित म्युझिकल नाईटचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित जेवणाच्या कार्यक्रमात बंदोबस्तातील शेकडो पोलिस कर्मचाऱ्यांना जेवण मिळाले नसल्याची माहिती समोर आली.

त्यामुळे पोलिस आयुक्तांच्या दावा फोल ठरला आहे. पोलिस आयुक्तांनी अधिवेशनात कुठल्याही पोलिसाला जेवणाची कमतरता पडणार नाही असे सांगून सिपी टू पीसी सर्वांना एकच जेवण मिळेल अशी भावना व्यक्त केली होती. शुक्रवारी पोलिसांच्या वतीने मानकापूर येथील क्रीडा संकुल येथे संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यानंतर जेवणाची सोय करण्यात आली होती. मात्र, यामध्ये प्रचंड तारांबळ उडाली. मधेच जेवण संपल्याने अनेकजणांना उपाशी राहण्याची वेळ आली. यामध्ये बाहेरून बंदोबस्तासाठी आलेल्या अनेक कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्यांनी कार्यक्रमातून निघून आपली जेवणाची सोय केली. मात्र, यामुळे पोलिसांच्या नियोजनाचे धिंडवडे निघाल्याचे दिसून आले.Latest Marathi News | Breaking Marathi News | Live News in Marathi | Sakal (esakal.com)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : 'म्हाडा'च्या इमारतीचं छत कोसळलं; विक्रोळीत दोन वृद्धांचा मृत्यू

LinkedIn Jobs Alerts : फ्रेशर आहात आणि चांगली नोकरी हवीय तर हे करायलाच हवं; LinkedIn नेच दिलाय लाखमोलाचा सल्ला

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

SCROLL FOR NEXT