Nagpur police removed egg bhurji Chinese carts Police news 
नागपूर

उपराजधानीतील ‘मिनीबार’ बंद झाल्याने मद्यशौकीनांची झाली अडचण; ‘सीपी’ची करडी नजर

योगेश बरवड

नागपूर : उपराजधानीतील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नागपूर पोलिस दलाने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. अवैध दारू विक्री करणारे तसेच ग्राहकांना दारू पिण्याची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या अंडाभूर्जी व चायनीज ठेले चालकांवर कारवाई करण्यात येत आहे. याप्रकरणात आतापर्यंत ७४ आरोपींना अटकही करण्यात आली आहे. २० ते २६ डिसेंबर दरम्यान मोठ्या संख्येने अंडाभूर्जी व चायनीजचे ठेले बंद करण्यात आले आहेत. ‘मिनीबार’ बंद झाल्याने मद्यशौकीनांची चांगलीच अडचण झाली आहे. 

शहरातील अनेक भागात असणारे चायनीज ठेले व अंडाभूर्जीच्या ठेल्यांवरून ग्राहकांना दारू पिण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. प्रामुख्याने ‘वाईन शॉप’ लगतच्या ठेल्यांवर असे प्रकार सर्रास चालत होते. पण, त्यामुळे गुन्हेगारीला चालना मिळत असल्याचे चित्र होते. शा ठेल्यांवरच वाद होऊन हत्येसारख्या गंभीर घटनाही घडल्याचे उघडकीस आले.

ऐवढेच नाही तर अनेक प्रकरणांमध्ये गुन्हेगारी कट अशा गुत्थ्यांवर शिजत असल्याचेही अनेक प्रकरणांमध्ये दिसून आले आहे. आजवर पोलिसांकडून थातूरमातूर कारवाई केली जात होती. पण, यावेळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनीच लक्ष घालून अवैध गुत्थे बंद करण्याचे आदेश दिले. ‘मिनीबार’ असणारे शहरातील अनेक चौक कुख्यात होते. पण, आता या चौकांनी मोकळा श्वास घेतला आहे. 

विशेष मोहिमेंतर्गत अवैधरीत्या मद्यविक्री करणारे, मद्यविक्री दुकानालगत अंडाभुर्जी, चायनिजचे ठेले लावणारे. मद्यपींना दारूपिण्याची सुविधा उपलब्ध करून देणारे सावजी भोजनालय, हॉटेल्स, ढाबे तसेच सार्वजनिक ठिकाणी दारू पिणारे. दारू पिऊन उपद्रव करणाऱ्या मद्यपींवर प्रामुख्याने कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत दीड हजाराहून अधिक ठिकाणी कारवाई करण्यात आली. गैरप्रकार आढळलेल्या ३६१ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.

७० प्रकरणांमध्ये दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. एकूण ७४ जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय ६९ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. त्यात दारूबंदी कायद्यान्वये ३,फौजदारी प्रक्रिया संहितेप्रमाणे ३५, भारतीय हत्यार कायद्यान्वये १२ जणांवर कारवाई करण्यात आली. गांजा बाळगणारे आमीर ऊर्फ गोलू बब्बा शेरखान व इम्रान अंसारी यांना अटक करण्यात आली. 

  • गुन्हेगारी तत्वांवर ‘सीपी’ची करडी नजर 
  • दीड हजारांवरून अधिक कारवाया 
  • गैरप्रकार करणाऱ्या ३६१ विक्रेत्यांवर कारवाई 
  • ७४ आरोपींना अटक 
  • शहरात ६९ ठिकाणी नाकाबंदी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख - नक्षलमुक्तीच्या दिशेने

मोठी बातमी! राज्यात होणार १८००० कंत्राटी शिक्षकांची भरती; जिल्हा परिषदेच्या १० पेक्षा कमी पटाच्या शाळांसाठी निर्णय; माध्यमिक शाळांसाठी ‘हा’ निर्णय

आजचे राशिभविष्य - 26 नोव्हेंबर 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 26 नोव्हेंबर 2025

समस्येची उकल करताना...!

SCROLL FOR NEXT