nagpur rain update monsoon rain forecast weather yellow alert in vidarbha sakal
नागपूर

Nagpur Rain Update : शहरात मॉन्सून ‘ॲक्टिव्ह मोड’वर; पावसामुळे नागपूरकरांचा ‘संडे’ घरातच!

दमदार हजेरी; मॉन्सून केवळ नागपुरातच नव्हे, विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सध्या पूर्णपणे सक्रीय

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सार्वजनिक सुटीचा दिवस असल्यामुळे अनेकांनी कामानिमित्त रविवारी सहकुटुंब घराबाहेर पडण्याचे बेत आखले होते. मात्र वरुणराजाने त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. दुपारपासून सायंकाळपर्यंत शहरात बरसलेल्या संततधार पावसामुळे बहुतेकांना सुटी घरीच चार भिंतीच्या आड घालवावी लागली. पावसामुळे एकीकडे काहींची तारांबळ उडाली, त्याचवेळी अनेकांनी पावसाचा व आल्हाददायक वातावरणाचा आनंदही घेतला.

मध्य भारतावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे वरुणराजा सध्या ‘ॲक्टिव्ह मोड’वर आहे. प्रादेशिक हवामान विभागाने जारी केलेल्या ‘यलो अलर्ट’चा प्रभाव रविवारी उपराजधानीत तीव्रतेने जाणवला.

मॉन्सून केवळ नागपुरातच नव्हे, विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सध्या पूर्णपणे सक्रीय आहे. शहरात दुपारी एकपर्यंत ढगाळ वातावरण राहिल्यानंतर अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. जवळपास तीन ते चार तास शहरात सगळीकडेच कमी अधिक प्रमाणात संततधार पाऊस बरसला.

दमदार पावसामुळे रस्त्यांवर सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. खोलगट भागांमध्येही जागोजागी पाणी तुंबले होते. त्यामुळे नागपूरकरांना दिवसभर रेनकोट व छत्र्या घेऊन फिरावे लागले. सायंकाळपर्यंत शहरात सरींवर सरी सुरू होत्या.

पाऊस व ढगाळ वातावरणामुळे आर्द्रता वाढल्याने तापमानात अडीच अंशांची घट झाली. परिणामतः वातावरण गारेगार झाले होते. अंधार पडल्याने वाहनधारकांना हेडलाईट सुरू ठेवत वाहने चालवावी लागली.

पावसामुळे एकीकडे पावसामुळे नागपूरकरांची तारांबळ उडाली, मनस्ताप सहन करावा लागला. त्याचवेळी अनेकांनी पावसाचा व आल्हाददायक वातावरणाचा आनंदही घेतला. रविवार सुटीचा दिवस असल्यामुळे बहुतांश जण विशेषतः सरकारी कर्मचारी घरी होते. रिपरिप पावसामुळे त्यांना अख्खा दिवस चार भिंतीच्या आडच घालवावा लागला.

हवामान विभागातर्फे सायंकाळी साडेपाचपर्यंत शहरात ३१ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. विदर्भात सर्वाधिक पाऊस (१४५ मिलिमीटर) ब्रम्हपुरी येथे पडला. याशिवाय गोंदिया (८८ मिलिमीटर) व गडचिरोली (७५ मिलिमीटर) येथेही मुसळधार पावसाने दाणादाण उडविली.

विदर्भात चार दिवस ‘यलो अलर्ट’

हवामान विभागाने विदर्भात आणखी चार दिवस ‘यलो अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे या आठवड्यातही जोरदार पाऊस अपेक्षित आहे. काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचाही इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: ऑस्ट्रेलियाचे स्वप्न भंगलं! इंग्लंडच्या संघाने दणदणीत विजयासह गाठली फायनल; कर्णधार चमकले

NCP: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पांडुरंग पवार यांचं प्राथमिक सदस्यत्व रद्द; पक्षविरोधी काम केल्याचा ठपका

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Pune Crime : शिवाजीनगर परिसरात एटीएमजवळ तरुणाला लुटले, २८ हजारांची रोकड चोरी

T20 World Cup: 'हा डेंजर संघ आहे...' Dhoni सूर्याच्या टीम इंडियाबद्दल स्पष्टच बोलला; मनातील भीतीही सांगितली

SCROLL FOR NEXT