ncp ncp
नागपूर

Nagpur : रामटेक लोकसभेवर राष्ट्रवादी दावा ठोकणार ; दोन्ही काँग्रसमध्ये बिनसणार

राजकीय पक्षातर्फे लोकसभा निवडणुकीची तयारी केली जात आहे. काँग्रेसने आजपासूनच लोकसभा मतदारसंघनिहाय बैठकांना प्रारंभ केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रामटेक लोकसभा मतदारसंघावर दावा केला जाणार आहे. या संदर्भात सोमवारी (ता.५) मुंबई येथे आयोजित बैठकीमध्ये स्थानिक नेत्यांना सर्व डेटा घेऊन बोलावण्यात आले आहे. या जागेवरून दोन्ही काँग्रेसमध्ये बिनसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सध्या सर्वच राजकीय पक्षातर्फे लोकसभा निवडणुकीची तयारी केली जात आहे. काँग्रेसने आजपासूनच लोकसभा मतदारसंघनिहाय बैठकांना प्रारंभ केला आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढण्याची चर्चा सुरू आहे. त्यानुसार जागा वाटपांचा फॉर्म्‍युला ठरवण्याच्या चर्चा सुरू आहे. मध्यंतरी तीनही पक्षांना प्रत्येकी १६ जागा लढाव्या असा प्रस्ताव समोर आला होता. मात्र या आकड्यावर कोणाची संमती होण्याची शक्यता दिसत नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वीच हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.

रामटेकवर राष्ट्रवादी दावा ठोकणार

स्थानिक राजकीय परिस्थिती बघून निर्णय घेतला जाईल असे त्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी १९ जागा मागितल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे लोकसभेच्या जागेवर दावा केला आहे.

पूर्व विदर्भात राष्ट्रवादी काँग्रसचा एकही खासदार नाही. गोंदिया-बुलढण्यात माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यापूर्वी निवडून आले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना पराभूत केले होते. त्यानंतर नाना यांनी हा मतदारसंघ सोडून नागपूरमध्ये धाव घेतली होती. येथे पराभूत झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या साकोली विधानसभा मतदारसंघात परतले आहेत. प्रफुल्ल पटेल राज्यसभेवर आहेत. ते या जागेवर दावा करण्याची दाट शक्यता आहे. पटोले याच जिल्ह्याचे असल्याने ते सहजासहजी ही जागा सोडणार नाहीत. त्यामुळे दुसरा पर्याय म्हणून रामटेक लोकसभा जागेची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे केली जाणार आहे.

रामटेक लोकसभेमधील काटोल-नरखेड आणि हिंगणा असे दोन मतदारसंघ राष्ट्रवादीच्या कोट्यात आहे. काटोलमध्ये अनिल देशमुख यांचे वर्चस्व आहे. माजी मंत्री रमेश बंग, काही जिल्हा परिषद सदस्यही या मतदारसंघात राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे इतर जागांच्या तुलनेत रामटेक लढणे सोयीचे असल्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे गोंदिया-भंडारा मिळावा याकरिता ही राष्ट्रवादीची स्टॅटेजी असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, चार जखमी

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT