Nagpur Ramtek water scarcity sakal
नागपूर

नागपूर : मुबलक जलसाठा, तरीही 'रामटेक' तहानलेले

उन्हाळा सुरू असताना प्रशासन पाण्याचा विषय केव्हा गांभीर्याने घेणार, जनतेचा प्रश्‍न

सकाळ वृत्तसेवा

रामटेक : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत नवीन पाणीपुरवठा करण्याकरिता पाइपलाइनचे काम कासवगतीने सुरू आहे. मागील दोन वर्षांपासून रस्ते खोदून पाइप टाकण्याचे काम आजही सुरू आहे, परंतु योजनेचे काम अपूर्ण असून राजकीय फायदा घेण्याच्या उद्देशाने लोकार्पण सुद्धा झाले आहे. लोकांना जुन्या पाइपलाइनद्वारेच पिण्याच्या पाण्याची सोय होत आहे, तीही अपुरी. काही ठिकाणी तर दोन दिवसाआड पाणी पुरवले जाते. त्यामुळे रामटेक शहरात खिंडसी जलाशयाचा मोठा साठा असूनही नगर परिषदेच्या चुकीच्या नियोजनामुळे लोकांना पाणी मिळत नसल्याची चित्र दिसत आहे.

नवीन पाइपलाईन ही काही ठिकाणी ‘ट्रायल बेसिक’ वर सुरू करण्यात आली असल्यामुळे त्याचे कनेक्शन हे सध्या घरातील पाइपला मग जोडल्यामुळे त्याचे पाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे लोकांना पिण्याला पाणी नाही. रस्त्यावर लोट वाहत असल्याचे चित्र काही ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना संताप वाढत चालला आहे. माजी नगरसेवक सुमीत कोठारी यांनी जनतेची अडचण लक्षात घेऊन आमदारांच्या मदतीने ज्या ठिकाणी पाणी मिळत नसेल, त्या ठिकाणी पाणी टँकरद्वारे पुरविण्याचे काम सुरू केले आहे.

आज रामटेक शहरातील भगतसिंग व आंबेडकर वार्डातील काही महिलांनी आमदार आशीष जयस्वाल यांच्याकडे तक्रार केली. त्यांचे म्हणणे असे की, दोन ते तीन दिवसांपासून त्यांच्या वार्डात पाणी येत नाही. घरातील कामांकरिता काहीच पाणी उपलब्ध नाही. आमदार जयस्वाल यांनी तूर्त फोन करून दोन्ही वार्डात पाण्याची व्यवस्था करायला सांगितले. आम्ही दोन्ही वार्डात पंधरा मिनिटात पाण्याची व्यवस्था करून दिली. रामटेक शहरातील कोणत्याही वार्डा पाण्याची समस्या असेल तर आम्हाला फोन करा, आम्ही त्याची समस्या सोडविण्याचा प्रयत्न करू. रामटेक शहरात पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. लोकांचे टिल्लू पंप बंद करण्यात यावे व प्रशासन पाणीचा नियोजन व्यवस्थितपणे करण्याची गरज आहे.

-सुमीत कोठारी, माजी नगरसेवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर काय होती राज ठाकरेंची प्रतिक्रिया? अमित ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करत सगळंच सांगितलं...

२४ तासात आरोपी ताब्यात! बाहेरच्या टॅक्सी चालकाला लोणावळ्यात मारहाण; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल

Kolhapur news: मुदाळतिट्टा चौकात वाहतूक कोंडीचा महापूर! वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि प्रवाशांचा त्रास शिगेला

Shrikant Shinde: शिवसेनेला शक्ती प्रदर्शनाची गरज नाही, अंबरनाथमध्ये भगवा ठाम; श्रीकांत शिंदेंनी स्पष्टचं सांगितलं

शुभमन गिलचं साराशी लग्न कधी? चाहत्याने थेट वडिलांनाच विचारला प्रश्न, Video तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT