Regional Psychiatric Hospital sakal
नागपूर

Regional Psychiatric Hospital : प्रादेशिक मनोरुग्णालयात सर्वच लेटलतीफ; मानसोपचारतज्ज्ञ, परिचारिकांसह फार्मासिस्टकडून नियम धाब्यावर

प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात सारेच कर्मचारी लेटलतीफ असल्याचे चित्र असून यामुळे मनोरुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

केवल जीवनतारे ः @kewalsakal

प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात सारेच कर्मचारी लेटलतीफ असल्याचे चित्र असून यामुळे मनोरुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

नागपूर - प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात सारेच कर्मचारी लेटलतीफ असल्याचे चित्र असून यामुळे मनोरुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तपासणीची वेळ होऊनही शेकडो रुग्णांची हाक ऐकणारे सकाळी साडेनऊ वाजतापर्यंत कुणीच नसल्याचे वास्तव सोमवारी (ता.१५) समोर आले.

प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागाचे द्वार सकाळी आठपूर्वी उघडले जाते. लगेच मनोरुग्णांची गर्दी होते. बाह्यरुग्ण विभागाची वेळ सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत आहे. यामुळे सकाळी आठला मानसोपचारतज्ज्ञ (डॉक्‍टर) खुर्चीत हवे. परंतु या नियमाला मानसोपचारतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, परिचारिका, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांनी बगल दिली आहे. साडेनऊनंतरच मनोरुग्णालयात डॉक्टरांचे आगमन सुरू होते.

‘सकाळ’च्या बातमीदाराने सकाळी ८ वाजता येथे भेट दिली. तेव्हा मनोरुग्णालयाच्या मुख्य द्वाराचे कुलूप उघडले होते. हातात झाडू घेऊन स्वच्छता कर्मचारी महिला आणि खिडकीत कार्ड वितरित करणारे कर्मचारी या व्यतिरिक्त मानसोपचार तज्ज्ञ, कर्मचारी-अधिकारी वेळेत पोहोचले नव्हते. मात्र ‘रुग्णांची गर्दी होते, रस्त्यावर थांबू नका’, असे आदेश सुरक्षारक्षक देत मनोरुग्णांना खुर्चीवर बसण्याची विनंती करीत होते. असे वारंवार एखाद्या ‘स्किझोफ्रेनिया’च्या मनोरुग्णाला सांगितल्यास तो चिडू शकतो, हे मानसोपचारतज्ज्ञांनाही माहीत आहे, तरीही बाह्यरुग्ण विभागात येण्याच्या वेळा कधीच पाळल्या जात नाहीत.

मनोविकृतीतज्ज्ञ डॉक्‍टरांच्या प्रतीक्षेत रुग्णांमध्ये तणाव वाढताना दिसत होता. मी आधी आलो असे सांगताना मध्येच एखादा मनोरुग्ण थेट पुढे जात होता.

या रुग्णांवर उपचारासाठी डॉक्‍टर वेळेत का येत नाहीत, अशी खंत व्यक्त करतानाच गरिबांकडे डॉक्टरांचेही लक्ष नाही, असे मनोरुग्णांचे नातेवाईक पुटपुटत होते. डॉक्टर्स उशिराने येत असल्याने रुग्णांना ताटकळत राहावे लागत असल्याचेही नातेवाईकांनी सांगितले.

डॉक्टरच नाहीत तर फार्मासिस्ट काय करणार?

मनोरुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागत आलेल्या मनोरुग्णांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, डॉक्‍टरांवर थेट आरोप करणे सुरू झाले. यवतमाळ, बल्लारशाह, अमरावती, चंद्रपूर, भंडाऱ्यापासून मध्यप्रदेशातील रुग्ण येतात. डॉक्‍टर, परिचारिकांसह कोणताही कर्मचारी वेळेत येत नसल्याची चीड मनोरुग्णांच्या नातेवाइकांनी व्यक्त केली.

विशेष असे की, मनोरुग्णालयात नामवंत मनोविकृतीतज्ज्ञ आहेत, परंतु सकाळी बाह्यरुग्ण विभागात केवळ एकच मनोविकृतीतज्ज्ञ कक्षात उपस्थित झाले. मेयो, मेडिकलातून आलेले निवासी डॉक्टर असावेत. सामाजिक कार्यकर्तेही १० वाजेपर्यंत आले नव्हते. तर ९.३५ वाजतापर्यंत मध्ये-मध्ये अतिरिक्त कार्यभारावर असलेले वैद्यकीय अधीक्षक ज्या इमारतीमध्ये मनोरुग्ण असतात, त्या भागात तैनात होते. वर्ग-१ चे पाचपैकी केवळ एक मानसोपार तज्ज्ञ दिसले, उर्वरित चार जण सकाळी १०.३० पर्यंत दिसले नाही.

सोमवारी कर्मचाऱ्यांच्या येण्याच्या वेळा अशा...

  • ९ वाजून १२ मिनिटांनी महिला डॉक्टर आल्या, स्वाक्षरी केली आणि हाताला सॅनिटायझर लावून निघून गेल्या.

  • ९ वाजून ३१ मिनिटांनी परिचारिकांची एन्ट्री झाली. त्या उपचार कक्षात जाऊन बसल्या.

  • ९ वाजून ३७ मिनिटांनी फार्मासिस्टचे आगमन झाले, वैद्यकीय अधीक्षकांच्या कक्षात जाऊन स्वाक्षरी केली.

  • ९ वाजून ४० मिनिटांनी दोन डॉक्टर आले. मनोविकृती कक्षात बसले.

  • ९ वाजून ४७ मिनिटांनी मनोविकृती कक्षात तज्ज्ञ डॉक्टर आले आणि रुग्णांच्या तपासणीला सुरुवात झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT