Right to Education  Esakal
नागपूर

RTE Fees:आरटीई विद्यार्थ्यांकडून शुल्क वसूल करणाऱ्या शाळेवर कारवाई नाहीच, माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे पोलिसांना पत्र

कोंढाळी येथील लखोटिया भूतडा विद्यालयातील आरटीईस पात्र ५९ विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारण्यात आले होते. नंतर ते परत करण्यात आले. ही शासनाची फसवणूक असून फौजदारी कारवाईची मागणी सदस्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur RTE Students Fees Case : कोंढाळी येथील लखोटिया भूतडा विद्यालयातील आरटीईस पात्र ५९ विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारण्यात आले होते. नंतर ते परत करण्यात आले. ही शासनाची फसवणूक असून फौजदारी कारवाईची मागणी सदस्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली.

परंतु या प्रकरणात शाळेवर फौजदारी कारवाईची गरज नसल्याचे मत पोलिसांना कळविल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलर यांनी बैठकीत दिली. विभागाकडून शाळेला बचाव करण्याचा प्रयत्न होत असून प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याची मागणी संजय झाडे यांनी केली.

संजय झाडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. ५९ विद्यार्थी आरटीईसाठी पात्र असताना संस्थेने शुल्क वसूल केले. ही रक्कम लाखांच्या घरात आहे. अनुदानाचा गैरवापर आहे. अशा संस्थेवर फौजदारी कारवाई करून मान्यता रद्द करण्यात यावी, असा मुद्दा झाडे यांनी उपस्थित केला. (Latest Marathi News)

ही बाब संस्थेनेच उघडकीस आणून दिली होती. त्यामुळे चौकशी समिती बसवून या प्रकरणातील वस्तुस्थिती तपासण्यात आली. संस्थेने या विद्यार्थ्यांचे शुल्क परत केले असल्याची माहिती माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी काटोलकर यांनी दिली.

आरटीईच्या विषयाची चौकशी कशी केली’, असा प्रश्न झाडे यांनी उपस्थित केला. आरटीई समितीचे सदस्य असल्याने आपल्या अधिकारात चौकशी केली. फौजदारी कारवाईची गरज वाटत नाही, असे मत आपण नोंदविल्याचे बैठकीत सांगितले. (Latest Marathi News)

अधिकारी संबंधित शाळेला वाचवण्याचा प्रयत्न करीत असून फौजदार कारवाई झाली पाहिजे असे म्हणत प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. यावर सीईओ सौम्या शर्मा यांनी आवश्यक कारवाई करण्याची ग्वाही दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT