Nagpur Sale birth control pills minor girls What does National Family Health Survey say police investigation  Sawkal
नागपूर

Nagpur : अल्पवयीन मुलींना गर्भनिरोधक गोळ्यांची विक्री; राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वे काय सांगतो ?

गर्भधारणेवर चिंता व्यक्त करीत सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे अल्पवयीन तरुणाईला रिलेशनशिपमध्ये असणे आवडू लागल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.

राजेश प्रायकर ः @rajeshp_sakal

नागपूर - ‘इंटरनेट’वरून ‘लैंगिक’ वेबसाइटचे मुक्त ‘सर्फिंग’ आणि ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ची तरुणाईत चांगलीच क्रेज वाढली आहे. यातून अल्पवयीन मुला-मुलींमध्येही लैंगिक संबंधांचे आकर्षण वाढले असल्याचे अल्पवयीन मुलींच्या प्रसूतीच्या आकडेवारीवरून दिसते. परंतु अनेक अल्पवयीन मुली डॉक्टरांच्या सल्ल्याशिवायच गर्भनिरोधक गोळ्या घेत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.

विशेष म्हणजे औषध विक्रेते ‘प्रीस्क्रिप्शन’शिवाय गर्भनिरोधक गोळ्यांची सर्रास विक्री करीत असून अन्न व औषध प्रशासन विभाग धृतराष्‍ट्र झाल्याचे दिसते.

गेल्या दोन वर्षात शहरातील मेडिकलमध्ये १८ वर्षांखालील ११ मुलींच्या प्रसूतीची नोंद झाली आहे. एवढेच नव्हे २०२०-२१ च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण कमी वयात नातेसंबंध निर्माण होत असल्याकडे लक्ष वेधले आहे. १५ ते १९ वर्षे वयोगटातील अर्थात अल्पवयीन

गर्भधारणेवर चिंता व्यक्त करीत सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे अल्पवयीन तरुणाईला रिलेशनशिपमध्ये असणे आवडू लागल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.

एवढेच नव्हे तीन वर्षांपूर्वी एका खाजगी संस्थेने देशातील २० प्रमुख शहरांत १३ ते १९ वर्षे वयोगटातील १५ हजार मुलांकडून माहिती घेत केलेल्या सर्वेक्षणातून धक्कादायक बाब उघडकीस आली होती. या मुलांकडून माहिती घेतली असता १४ वर्षांखालील मुले व १४ वर्षांवरील असलेल्या मुली पहिल्यांदा लैंगिक सुखाचा आनंद घेत असल्याची बाब उघडकीस आली.

नागपुरातही नुकताच मेडिकलमधील १८ वर्षांखालील ११ मुलींच्या प्रसूतीने लैंगिक संबंधाबाबतचे वास्तव पुढे आले. गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या घेताना डॉक्टरांचे मार्गदर्शन गरजेचे आहे. परंतु शहरात अनेक अल्पवयीन मुले, मुलींना गर्भनिरोधक गोळ्या सहजच उपलब्ध असल्याचे काही दुकानांमध्ये फिरल्यानंतर दिसून आले. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर होत असल्याने या मुलींच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली.

दुकानदारांना मोकळीक

‘प्रिस्क्रिप्शन’शिवाय औषधे देऊ नये, असा कायदा आहे. परंतु, गर्भनिरोधक गोळ्यांबाबत हा कायदा शिथिल असल्याचे दिसत आहे. गर्भनिरोधक गोळ्यांची सर्रास विक्री केली जात असल्याने प्रशासनानेही दुकानदारांना मोकळीक दिल्याचे चित्र आहे. या औषध विक्रेत्यांवर प्रशासनाचे कुठलेही नियंत्रण नसल्याचे दिसते.

कारवाईची हजारो प्रकरणे प्रलंबित

औषध विक्रेत्यांवर कारवाईबाबतची राज्य सरकारकडे अपिलातील सहा हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. न्यायालयातही दोन हजारांवर खटले प्रलंबित आहेत. त्यामुळे संबंधितांना शिक्षा होत नाही. यावर उपाय म्हणून उल्लंघन करणाऱ्यांवर धाक निर्माण करण्यासाठी दंडाची तरतूद आहे. परंतु, ही कारवाईही होत नसल्याने विक्रेत्यांवर धाक नसल्याचे सूत्राने नमूद केले.

गेल्या काही वर्षांत वाढला वापर

कॉलेज, नोकरीमुळे वारंवार होणाऱ्या पार्ट्या, नाईटलाइफ, आउटिंग, डेटिंग, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहण्याच्या प्रकारात गेल्या काही वर्षांत वाढ झाली आहे. इंटरनेटवर उपलब्ध विविध ‘पॉर्न साइट’मुळे लहान वयातच मुला-मुलींमध्ये आकर्षण व लैंगिक सुखाबाबत उत्सुकता वाढली आहे. यातूनच गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर वाढल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले.

गर्भनिरोधक गोळ्यांचे एक सायकल असते. अल्पवयीन मुलींनी घेतल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. लग्नानंतर भविष्यात ओव्हरीचा कॅन्सर होऊ शकते. याशिवाय अलिकडे जाहिराती बघून आय-पील गोळ्या घेतल्या जातात. एखादवेळी त्यामुळे रक्तस्त्राव होण्याचा धोका आहे. रक्तस्त्राव झाल्यास त्यावर नियंत्रणासाठी आणखी गोळ्या घ्याव्या लागतात. हे धोकादायक आहे.

डॉ. संगीता खंडाईत, प्रसूतीरोग तज्ज्ञ, इंदिरा गांधी रुग्णालय, मनपा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT