Nagpur ST suspended  sakal
नागपूर

नागपूर : एसटीचे १६ कर्मचारी बडतर्फ

१८ जणांना दिली होती कारणे दाखवा नोटीस

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : संपात सहभागी झालेल्या एसटी (Nagpur ST) कर्मचाऱ्यांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेत आज १६ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले. गेल्या १४ आणि १५ डिसेंबर रोजी एकूण १८ कर्मचाऱ्यांना कारणमीमांसा नोटीस बजावली होती. सेवेतून बडतर्फ का करण्यात येऊ नये, याचे उत्तर सादर करण्यासाठी सात दिवसाची मुदत कर्मचाऱ्यांना दिली होती. या १८ पैकी १६ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याची माहिती विभागीय नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी दिली. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी गेल्या दीड महिन्यापासून कर्मचारी संपावर आहेत. परिवहन मंत्र्यांनी निलंबित कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर रुजू झाल्यास त्यांचे निलंबन मागे घेण्यात येईल, असे सांगितले होते. पण बहुतांश कर्मचऱ्यांनी आवाहनाला जुमानले नाही. विभागात आजवर केवळ ३९ निलंबित कर्मचारी कामावर रुजू झाले असून, एकूण कर्मचाऱ्यांपैकी अद्यापही १८०० वर कर्मचारी संपावर ठाम आहे.

नागपूर विभागात एसटीमध्ये प्रशासकीय ४८१, कार्यशाळा ५५३, चालक ८०२ व वाहक ६५६ असे एकूण २४९२ कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी जवळपास सातशे कर्मचारी हे कामावर हजर असून, काही अधिकृत रजेवर आहेत. तर अद्यापही तब्बल १८०० वर कर्मचारी संपावर आहेत. संपकर्त्या १८ कर्मचाऱ्यांना यापूर्वीच विभागाकडून बडतर्फीची नोटीस बजाविली होती. त्यांना उत्तर देण्यासाठी ७ दिवसाची मुदत दिली होती. त्यामुळे शुक्रवारी त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून होते. अखेर प्रशासनाने १८ पैकी १६ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले. या बडतर्फीच्या कारवाईने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असून आता पुढे कर्मचारी कोणती पाऊले उचलतात याकडे लक्ष लागले आहे.

१६ बस धावल्या

नागपूर विभागातून शुक्रवारी १६ बस धावल्या. १६ बसनी ४८ फेऱ्या केल्‍या. यात गणेशपेठ ६, इमामवाडा ३, उमरेड ३, सावनेर २ आणि वर्धमान नगर २ बसांचा समावेश आहे. १८१३ प्रवाशांनी प्रवास केला असून यातून एसटीला १ लाख ३ हजार १९० रुपयांचे उत्पन्न मिळाले असल्याची माहिती नीलेश बेलसरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शाब्बास ! दुसरा नीरज चोप्रा; आशिष यादवने U20 World Championships मध्ये जिंकलं ऐतिहासिक पदक; शेतकऱ्याच्या लेकाची भरारी

मुंबईत भररस्त्यात बर्थडेचा धिंगाणा! बोनेटवर केक कटिंग अन् एअरगनने गोळीबार, भाजप कार्यकर्त्यासह १० जणांना अटक; Video Viral

Shoumika Mahadik Satej Patil : भावा हे कोल्हापूर! वर्षानुवर्षांचा राजकीय वाद बाजूला; शौमिका महाडिकांनी कुटुंबीयांसोबत सतेज पाटलांचे केले सांत्वन

Bofors Case: ‘बोफोर्स’ प्रकरणाला ४० वर्षांनी पूर्णविराम, सर्वोच्च न्यायालयातील शेवटची याचिकाही निकाली

Delhi High Court: आंदोलनाची जागा का बदलत नाही?; दिल्ली उच्च न्यायालयाची जंतरमंतरविषयी विचारणा

SCROLL FOR NEXT