ग्रंथतुला sakal
नागपूर

Nagpur : एका लग्नाची गोष्ट ; पोलिस नवरदेवाने विवाहप्रसंगी केली नववधूची ग्रंथतुला

हिरापूर येथील राजेश विमल दत्तात्रय मादेवार हे नागपुरातील धंतोली येथील पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : लग्न समारंभासाठी होणाऱ्या मोठ्या खर्चाला फाटा देत पोलिस उपनिरीक्षक असलेल्या नवरदेवाने स्वतःच्या लग्नात नववधुची ग्रंथतुला केली. ग्रंथतुलेनंतर ही पुस्तके लग्नात सहभागी शेतकरी व इतर पाहुण्यांना भेट म्हणून दिली.

संविधान, राट्रसंत तुकडोजी महाराजांसह इतरही महापुरुषांचे विचार रुजवित वाचन संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या खाकी वर्दीवाल्याच्या अनोख्या विवाह सोहळ्याची चर्चा होत आहे. राजेश मादेवार आणि दीपाली बुरेवार यांच्या या अनोख्या लग्नाची गोष्ट स्मरणीय आणि वाचनीय आहे.

हिरापूर येथील राजेश विमल दत्तात्रय मादेवार हे नागपुरातील धंतोली येथील पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांचा विवाह तेंलगणा(आदिलाबाद (बेला)) येथील दीपाली सुनीता प्रकाश बुरेवार यांच्याशी नुकताच अत्यंत आदर्शवत पद्धतीने संपन्न झाला. श्री गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रमचे सेवाधिकारी ज्ञानेश्वर रक्षक आणि वराचे ज्येष्ठ बंधू संजय मादेवार, मराठा सेवा संघाचे संजय गोडे यांच्या पुढाकारातून पार पडलेल्या लग्न सोहळ्याची ग्रंथतुलेसह

खाकीतील नवरदेवाने विवाहप्रसंगी केली नववधूची ग्रंथतुला

अनेक वैशिष्ट्ये होती. यांच्या लग्नपत्रिकेत मुहूर्ताचा उल्लेख करण्यात आला नाही. ग्रामगीतेतील वैवाहिक संस्कारानुसार अध्यायातील ओव्यांचा समावेश असलेल्या पत्रिका वाटण्यात आल्या. केवळ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून विवाह संस्कारास सुरवात झाली. कोणताही अंतरपाट न धरता विवाह पार पडला. राष्ट्रसंतांनी लिहिलेली मंगलाष्टके वाचण्यात आली.

अशी झाली ग्रंथ तुला

लग्न सोहळ्यानंतर दीपाली राजेश मादेवार यांची ग्रंथतुला करण्यात आली. एका पारड्यात वधू आणि दुसऱ्यात भारतीय संविधान, ग्रामगीता, बालशिक्षण, अभ्यास कसा करावा, अशी परिवर्तनवादी विचारसरणीची पुस्तके होती. यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेली सर्व पुस्तके परिसरातील शाळा व वाचनालयांना भेट देण्यात येणार आहेत. तर संविधान, ग्रामगीता व इतर पुस्तकांचे वाटप यावेळी सोहळ्यात उपस्थितांना करण्यात आले. अग्निसंस्कार आणि शांतीपाठ झाल्यावर शेवटी सामूहिक राष्ट्रवंदना झाली.

नागरिकांमध्ये समता, बंधुता रुजावी यासाठी प्रत्येकाने महापुरुषांचे विचार आत्मसात करणे आवश्यक आहे. मोबाईलमुळे लोप पावत असलेली वाचन संस्कृती रुजावी या हेतूने ही ग्रंथतुला करण्यात आली. ग्रामगीतेचे अभ्यासक ज्ञानेश्वर रक्षक यांच्यामार्फत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सद्विचारांचा स्पर्श झाला.

— राजेश मादेवार, पोलिस उपनिरीक्षक, धंतोली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT