Nagpur students two startup concept in first five
Nagpur students two startup concept in first five 
नागपूर

नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा : पहिल्या पाचमध्ये दोन 'स्टार्टअप' संकल्पना, काय आहे विशेषता...

मंगेश गोमासे

नागपूर : कोरोना काळात एकीकडे रोजगाराच्या संधी हिरावल्या गेल्या. दुसरीकडे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदाचा वापरही वाढला. या दोन्ही संकल्पनातून उद्योजकता शोधण्याच्या दृष्टीने हिस्लॉपमधील बी.एस.सी प्रथम वर्षाच्या चैतन्य गडेकर आणि श्रृती चिपडे या दोघांनीही अनोख्या स्टार्टअपची निर्मिती केली. मुंबई येथील सर सीताराम आणि लेडी शांताबाई पाटकर कला व विज्ञान महाविद्यालय आणि व्ही.पी. वर्दे कॉलेज ऑफ कॉमर्स ऍण्ड इकॉनॉमिक्‍स येथील "एंटरप्रिनर इन यू' या राष्ट्रीय स्पर्धेत पहिल्या पाचमध्ये येण्याचा मान पटकाविला आहे. 

ऑनलाइन अभ्यासक्रमाचे भूत आणि कोरोनातून कसे वाचता येईल या दोनच गोष्टींचा विचार सध्या नागरिक करताना दिसून येत आहेत. एकीकडे अनेकांचे रोजगार गेले तर दुसरीकडे अनेकजन यातून मार्ग काढण्यासाठी आपल्या जीवनपद्धतीमध्ये बदल करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे या दोन्ही गोष्टींवर विचार करून श्रृती चिपडे आणि चैतन्य गडेकर यांनी "स्टार्टअप'ची निर्मिती केली आहे.

चैतन्यने औषधीयुक्त वनस्पतीचे अधिकाअधिक प्रकार तयार करून व्हर्टिकल फार्मिंगच्या माध्यमातून ते विकसित करीत फार्मा कंपन्या आणि संशोधकांपर्यंत पोहोचवून देण्याची अभिनव संकल्पना मांडली. यामध्ये बायोटेक्‍नॉलॉजी ते बॉटनी पदवीधराचा समावेश करता येणे शक्‍य होणार आहे. त्यालाही रोजगार मिळणे शक्‍य होईल असा विचार मांडला. 

श्रृती चिपडे हिने नोकरीसाठी अर्ज करणारा उमेदवार आणि त्याच्या कौशल्याच्या अनुषंगाने आवश्‍यक असलेली संधी उपलब्ध करून देण्यासाठी थेट निवडकर्त्याशी त्याच्या आवश्‍यकतेनुसार संवाद साधून देणाऱ्या "ऍप'ची संकल्पना मांडली. यामुळे कंपनीला हवा असणारा योग्य उमेदवार आणि उमेदवाराला हवी असणारी योग्य कंपनी यामध्ये दुवा म्हणून काम करता येणे शक्‍य होणार आहे. यासाठी उमेदवाराने आपली शैक्षणिक माहिती आणि अपेक्षाही नोंदविता येणे शक्‍य होणार असल्याचे त्यात स्पष्ट केले.

गुणवत्तेचे प्रमाणपत्र प्रदान

या संकल्पना त्यांनी "एंटरप्रिनर इन यू' या राष्ट्रीय स्पर्धेत 13 जुलैदरम्यान सादर केले. यानुसार स्पर्धेत आलेल्या संकल्पनांचे व्याज, व्यवहार्यता, गुंतवणुकीची सुलभता, खर्च-लाभ विश्‍लेषण, रोजगार निर्मिती, टिकाव, यूएसपी, सामग्रीची उपयुक्तता आणि एकूणच ठसा या आधारावर मूल्यांकन करण्यात आले. त्यात या दोन्ही संकल्पनांना पहिल्या पाच संकल्पनांमध्ये स्थान मिळविता आले. यासाठी त्यांना गुणवत्तेचे प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशाचे इंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट सेलचे शिक्षक प्रभारी प्राचार्य डॉ. प्रशांत शेळके यांनी कौतुक केले. 

संपादन - नीलेश डाखोरे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

Pune Crime : सहा महिन्यांच्या बालकाची तीन लाखांत विक्री; बालकाचे अपहरण करणाऱ्या टोळीला कर्नाटकातून अटक

RTE Admission : आरटीईच्या प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

LSG vs MI IPL 2024 Live : इशान किशन अन् नेहलनं डाव सावरला

SCROLL FOR NEXT