नागपूर

Nagpur : युद्ध सुदानमध्ये आणि भारतातल्या भाज्यांचा रस्सा होतोय पातळ, काय आहे कारण घ्या जाणून घ्या

सुदानमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतात मगज बीची आवक कमी झाल्याने नवे संकट उभे ठाकले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : लग्नसराईचे दिवस सुरू असताना पनीरसह इतर भाज्यांचा स्वाद वाढवणाऱ्या मगजचे (टरबूज बीज) भाव आकाशाला भिडले आहेत. सुदानमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतात मगज बीची आवक कमी झाल्याने नवे संकट उभे ठाकले आहे. भाव वाढू लागल्याने पनीर आणि इतर भाज्यांचा रस्सा पातळ होऊ लागला आहे.

सुदानमध्ये युद्ध सुरू असून बाजारात टरबूज मगजची आवक खूपच कमी आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडे चांगल्या दर्जाच्या टरबूज मगजचा मोठा तुटवडा आहे. परिणामी, मगजच्या दरात विक्रमी वाढ झालेली आहे. महिन्यापूर्वी ४०० रुपये किलो मिळणारे मगज आता ८०० रुपये किलोवर पोहचले आहे.

भारतातील खपाच्या तुलनेत यावेळी त्याचे उत्पादन कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या टरबूज मगजचा साठा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. सुदानमधून टरबुजाच्या बियांची आवक होत नसल्याने देशी मगज बियाण्यांवर ताण वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याच्या किमती आणखी वाढू शकतात. रेस्टॉरेट, हॉटेल आणि केटरर्स व्यावसायिकांकडून मगजला सर्वाधिक मागणी असते. लग्न सराईमुळे मागणी वाढू लागली असताना आवक कमी झालेली आहे.

सुदानमधून मगज बीची आवक कमी झालेली आहे. त्यामुळे त्याची टंचाई जाणवू लागल्याने भावात विक्रमी वाढ झालेली आहे. भविष्यात ९०० रुपयापेक्षा अधिक रुपये किलोवर जाण्याचा अंदाज आहे.

किरण दफ्तरी, ड्रायफ्रुट विक्रेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT