satish itkelwar Sakal
नागपूर

Teachers Constituency Election : नाशिकनंतर नागपूरमध्ये राजकीय भूकंप; राष्ट्रवादीकडून अर्ज मागे

राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून अर्ज माघार घेतल्यानंतर ठाकरे गटाही त्यांचा अर्ज मागे घेणार का? याचा सस्पेन्स मात्र अद्याप कायम आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Teachers Constituency Election : नाशिकनंतर नागपूरमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. नागपूर शिक्षक मतदासंघासाठी राष्ट्रवादीकडून अर्ज माघारी घेण्यात आला आहे.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

राष्ट्रवादीकडून अर्ज मागे नागपूरमधून राष्ट्रवादीच्या सतीश इटकेलवार यांचा अर्ज मागे घेण्यात आला आहे.

नागपूर शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसकडून सुधाकर अडबालेंचं नाव जवळपास निश्चित करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून अर्ज माघार घेतल्यानंतर ठाकरे गटाही त्यांचा अर्ज मागे घेणार का? याचा सस्पेन्स मात्र अद्याप कायम आहे.

सत्यजीत तांबेंच्या बंडानंतर नाशिक-नागपूर जागेची काँग्रेस, ठाकरे गटात नेमकी काय अदलाबदल होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सतीश इटकेलवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नागपूरचे प्रवक्ते आणि ओबीसी सेलचे प्रमुख आहेत.

सत्यजीत तांबेंची खेळी; भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

महाराष्ट्र युवक काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी कॉंग्रेसला मोठा धक्का दिला आहे. त्यांनी नाशिक शिक्षण मतदारसंघ निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार अर्ज भरला आहे. अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असलो तरी मी कॉंग्रेसचाच उमेदवार असल्याचे तांबे यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : नक्की कोण जिंकलं? कोण हरलं? भारत-पाक सामन्यावरून राज ठाकरेंचे फटकारे, नवं व्यंगचित्र केलं शेअर....

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ, नेमकं काय घडलं ?

Ganesh Festival : राज्योत्सव संहितेची गरज; गणेशोत्सवाच्या स्वरूपावर शासनाची भूमिका स्पष्ट करावी

PMC Hospitals : महापालिकेची आरोग्यसेवा ‘आजारी’, वर्ग १ ते ४ मधील तब्बल ६३५ पदे रिक्त; रुग्णसेवेवर परिणाम

Latest Marathi News Updates : अजित पवारांच्या ताफ्यासमोर तरुणांचा आत्मदहनाचा प्रयत्न, बीडमधील प्रकार

SCROLL FOR NEXT