Nagpur  Esakal
नागपूर

Nagpur Bribe: दीड हजाराची लाच घेताना मुख्याध्यापकांना अटक, पगार मंजूर करण्यासाठी मागितले होते पैसे

कोंढाळीतील मसाळा येथील आश्रमशाळेच्या दोन मुख्याध्यापकांना दीड हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Head Master Arrested While Taking Bribe: कोंढाळीतील मसाळा येथील आश्रमशाळेच्या दोन मुख्याध्यापकांना दीड हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. बिल मंजूर करून पगार काढण्यासाठी लाच घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शाळेतीलच २४ वर्षीय सेवकाच्या तक्रारीवरून मंगळवारी ही कारवाई केली. आनंदराव तुकाराम येसनसुरे (वय ४५, रा. वायुसेनानगर, दाभा) व चंद्रकुमार महादेवराव भादे (वय ५६, रा. शिक्षक कॉलनी, कोंढाळी) अशी अटकेतील मुख्याध्यापकांची नावे आहेत.

येनसुरे हे गजबे माध्यमिक आश्रम शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक तर भाद हे आदिवासी गोवारी शहीद स्मृती प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आहेत. तक्रारदार हा मसाळा येथील आदिवासी गोवारी शहीद स्मृति प्राथमिक आश्रमशाळेत सेवक आहे.

त्याचा पगार मिळाला नाही. बिल काढून पगार मंजूर करण्यासाठी येसनसुरे यांनी तक्रारदाराला दोन हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने भादे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही दोन हजार रुपये देण्यास सांगितले. सेवकाने एवढी रक्कम देणे शक्य नसल्याचे सांगितले. येसनसुरे यांनी दीड हजार रुपये दिल्याशीवाय काम होणार नाही,असे सांगितले. सेवकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. (Latest Marathi News)

अधीक्षक राहुल माकणीकर, अपर अधीक्षक संजय पुरंदरे, सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शिवशंकर खेडेकर,उज्ज्वला मडावी, हेडकॉन्स्टेबल पंकज घोडके, अमोल मेंघरे, प्रफुल्ल बांगडे, प्रिया नेवरे यांनी सापळा रचला. दीड हजार रुपयांची लाच घेताच पोलिसांनी आधी येसनसुरे व नंतर भादे यांना अटक केली. कोंढाळी पोलिस ठाण्यात या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकमध्ये खळबळ! आश्रम शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म, सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह, पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

Tamil Nadu Reservation Case : मुख्यमंत्री विजय इस्लाम स्वीकारणाऱ्यांसाठी आरक्षण देण्याच्या बाजूने, तामिळनाडू सरकारची सुप्रीम कोर्टात धाव

Latest Marathi News Live Update : मोशीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीत बचावकार्य अद्यापही सुरुच

Gold Rate Today: सोनं 5 हजारांनी महागलं! सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ; मुंबई-पुण्यात 22 कॅरेट आणि 18 कॅरेटचा भाव किती?

Alcohol Flavour Violation : रम, ब्रँडी, व्हिस्की, वाईन, बिअरच्या फ्लेवरमध्ये भेसळ; अन्न सुरक्षा विभागाची कारवाई, तुकाराम मुंडेंनंतर केंद्र प्रशासन जागे

SCROLL FOR NEXT