Accident sakal
नागपूर

नागपूर : दहा महिन्यांत अपघातात दोनशे जणांनी गमावला जीव

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांत अपघाताच्या संख्येत मोठी वाढ

राजेश प्रायकर -सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांत अपघाताच्या संख्येत मोठी वाढ झाली. या अपघातात दोनशेवर जणांनी जीव गमावल्याने त्यांचे कुटुंब हादरले. विशेष म्हणजे रिंग रोडच्या तुलनेत शहरातील रस्त्यांवर अपघाताची संख्या वाढल्याने रस्त्यांसह तरुणाईचे स्टंंटबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.

कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने दिलासा मिळाला असतानाच गेल्या दहा महिन्यातील अपघात व त्यात मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या आकडेवारीने चिंतेत भर घातली आहे. सिमेंटीकरणामुळे गुळगुळीत झालेल्या रस्‍त्यांवरून वाहनांचा वेग वाढला असून दोनशेवर नागरिकांच्या जीवावर बेतले आहे. यंदा जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांत ७६७ अपघाताची नोंद करण्यात आली.

मागील वर्षी ५९८ अपघात झाले होते. त्यात यंदा २६९ अपघाताची भर पडली. यंदा अपघातात २१७ जणांनी जीव गमावला तर ८३ जखमी झाले. मागील वर्षी अपघातबळींची संख्या १५६ जणांचा मृत्यू झाला तर ५१ जण गंभीर जखमी झाले होते. मोठेच नव्हे तर लहान किरकोळ अपघातामुळेही अनेकजण जखमी झाले. रिंग रोडच्या तुलनेत यंदा शहरातील अंतर्गत रस्तेच जास्त धोकादायक झाल्याचे वाहतूक विभागातील सुत्राने सांगितले. यंदा झालेल्या ७६७ अपघातांपैकी ४९३ अपघात अंतर्गत रस्त्यांवर झाले आहेत.

अंतर्गत रस्त्यांच्या तुलनेत रिंग रोडवरील अपघातांच्या संख्येत यंदा घट झाली. रिंग रोडवर गेल्या दहा महिन्यात ४४ अपघात झाले. मागील वर्षी रिंग रोडवर ६९ अपघाताची नोंद करण्यात आली होती. काटोल, उमरेड व भंडारा रोडवर अपघाताच्या संख्येत घट दिसून येत आहे. काटोल रोडवर यंदा १४, उमरेड रोडवर नऊ तर भंडारा रोडवर २० अपघात झाले.

मागील वर्षी या रोडवर अनुक्रमे १९, ११, २४ अपघात झाले होते. परंतु वर्दळीचा वर्धा रोड, जबलपूर रोड, अमरावती रोड, छिंदवाडा रोड, हिंगणा रोडवरील अपघातात वाढ झाली आहे. वर्धा रोडवर ४६, जबलपूर रोडवर ४९, अमरावती रोडवर ४३, छिंदवाडा रोडवर ३१, हिंगणा रोडवर १८ अपघात झाले. मागील वर्षी याच रोडवर अनुक्रमे ३२, २६, ३०, २६ आणि सहा अपघाताची नोंद करण्यात आली होती.

मागील वर्षी व यंदाचे अपघात

रस्ता २०२१ २०२०

वर्धा रोड ४६ ३२

जबलपूर ४९ २६

अमरावती ४३ ३०

भंडारा २० २४

छिंदवाडा ३१ २६

काटोल १४ १९

रिंग रोड ४४ ६९

हिंगणा १८ ०६

उमरेड ०९ ११

इतर रस्ते ४९३ ३५५

------------------------------

अपघात २०२१ २०२०

जीवघेणे २०५ १४५

गंभीर २९७ २२८

किरकोळ २६० २२५

एकूण ७६७ ५९८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs SLW T20I: स्मृती मानधनाने रचला नवा विश्वविक्रम, शफाली वर्माचीही मिळाली साथ; भारताचा श्रीलंकेविरुद्ध विजयाचा चौकार

Pune Municipal Election : पुण्यात मोठा ट्विस्ट! मनपा निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार? उद्या अधिकृत घोषणा होण्याची शक्यता

RPI Protest : जागावाटपावरून रिपाइंची नाराजी; भाजप कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन!

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

१११ वर्षांनंतर विदर्भातील पहिला मानाचा पट पुन्हा सुरू, विदर्भ केशरी शंकरपट मैदानाची धावपट्टी गाजणार

SCROLL FOR NEXT