esakal
नागपूर

Nagpur University: नागपूर विद्यापीठाच्या बोगस पदवीवर २६ जणांना परदेशात नोकरी! इराक दुतावासाने केली पोलखोल

२६ विद्यार्थ्यांनी मिळविली विदेशात नोकरी, इराक दुतावासाने केली पोलखोल

मंगेश गोमासे : @mangeshG_sakal

नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नावाने बोगस पदव्या तयार करून २६ जणांनी थेट इराकमध्ये नोकरी मिळविल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इराक दुतावासाकडून या पदव्यांच्या पडताळणीसाठी विद्यापीठ आणि महविद्यालयासोबत झालेल्या पत्रव्यवहारातून ही बाब उघड झाली आहे.

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इराक येथील दुतावासामधून साकोलीतील बाजीराव करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी, वर्धेतील बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालय आणि शहरातील डॉ. आंबेडकर महाविद्यालयात एक पत्र आले.

त्यामध्ये तिथे नोकरी करणाऱ्या एकूण २६ विद्यार्थ्यांची नावे आणि त्यांच्या पदवी आणि गुणपत्रिका त्याच महाविद्यालयातील आहे काय? अशी विचारणा करण्यात आली.

यावर महाविद्यालयांकडून असे कोणतेही विद्यार्थी आमच्या महाविद्यालयात शिकले नसल्याची माहिती दिली गेली. त्यांचा इनरॉलमेंट क्रमांक नसल्याचेही पडताळणीत स्पष्ट केले. त्यानंतर दुतावासाकडून नागपूर विद्यापीठाला ईमेल करण्यात आला.

पुन्हा हीच माहिती विचारण्यात आली. विद्यापीठाच्या पदवी आणि गुणपत्रिका तपासणी विभागाकडून या सर्व पदव्या आणि गुणपत्रिकांची शहानिशा केली असता, विद्यापीठाचा लोगो आणि कुलगुरूंची स्वाक्षरी असलेल्या या पदव्या आणि गुणपत्रिका बनावट असल्याचे आढळून आले.

इराक दुतावासाचे समन्वयक विद्यापीठात

इराक दुतावासामधील समन्वयक अब्दुल हमीद यांनी याची खातरजमा करण्यासाठी १४ जूनला स्वतः विद्यापीठाला भेट दिली.

या बनावट पदव्या बघून त्यांना चांगलाच धक्का बसल्याचे समजते. इराक येथील दुतावासाकडे आलेल्या पदव्या आणि गुणपत्रिका या २०१७, २०१९ आणि २०२० या दरम्यानच्या आहेत.

विशेष म्हणजे, २०१९ आणि २०२० या काळात देशभरात कोरोनाचे सावट होते. सर्वाधिक २४ पदव्या या फार्मसीच्या, २ अभियांत्रिकी तर एक मायक्रोबायोलॉजीच्या आहेत.

पोलिस ठाण्यात अद्याप तक्रार नाही!

विद्यापीठाचा लोगो आणि नाव वापरून बोगस पदव्या आणि गुणपत्रिका तयार करण्याचे प्रकरण समोर आले असतानाही विद्यापीठाने पोलिस ठाण्यात अद्याप कुठलीच तक्रार केलेली नाही. केंद्राच्या उच्च शिक्षण विभाग, परराष्ट्र मंत्रालय, गृहविभाग आणि विद्यापीठ अनुदान आयोगाला माहिती दिली आहे.

असे आले उजेडात

२६ विद्यार्थ्यांनी इराकमधील एका कंपनीमध्ये नोकरी मिळविली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी त्यांचे सर्व दस्तावेज इराकच्या ‘फॉरेन रिजनल रजिस्ट्रेशन ऑफीस’ (एफआरआरओ) यांच्याकडे पाठवण्यात आले होते.

या कार्यालयाला सादर केलेल्या पदव्या व गुणपत्रिका बनावट असल्याचा संशय आला. त्यानुसार संबंधित महाविद्यालयांना जूनच्या पहिल्या आठवड्यात पत्र पाठविले. त्यानंतर विद्यापीठाकडे विचारणा करण्यात आली.

विद्यापीठाचे मौन

या प्रकरणाबाबत परीक्षा व मूल्यमापन संचालक यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनीही प्रतिसाद दिला नाही. या बोगस पदव्यांची निर्मिती विद्यापीठातून झाली की कोणी परस्पर केली याचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT