yes bank 
नागपूर

येस बॅंकेत नागपूर विद्यापीठाचे अडकले तब्बल १९१ कोटी...सिनेट सदस्य संतापले

सकाळवृत्तसेवा

नागपूर : रिझर्व्ह बॅंकेने येस बॅंकेवर आर्थिक निर्बंध टाकल्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे आर्थिक व्यवहार अडचणीत येणार आहे. यासंदर्भात "सकाळ'ने प्रकाशित केलेल्या वृत्तावर शुक्रवारी (ता.6) नविन प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या सिनेट बैठकीत सदस्यांनी प्रशासनाला राष्ट्रीयकृत बॅंका असताना, खासगी बॅंकामध्ये रक्कम का ठेवण्यात आली? असा सवाल उपस्थित करुन चांगलेच धारेवर धरले. दरम्यान सदस्यांनी या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याची मागणी केली. 

येस बॅंकेचा एनपीए वाढल्याने रिजर्व बॅंकेने या बॅंकेच्या व्यवहारावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बॅंकेतून 50 हजारापेक्षा जास्त पैशाचे विड्रॉल करता येणे अशक्‍य आहे. विद्यापिठासोबत काही वर्षांपूर्वी झालेल्या करारानुसार येस बॅंकेसोबत व्यवहार करण्याचे ठरविले. विद्यापीठाच्या ऑनलाईन सर्वीससाठीही येस बॅंकेसोबत करार करण्यात आला होता. त्यातूनच कोट्यवधी रुपयाच्या ठेवी बॅंकेत ठेवण्यात आलेल्या आहेत. "सकाळ'ने हे वृत्त प्रकाशित करताच, शुक्रवारी बैठकीत त्याचे पडसाद उमटले.

सदस्यांनी सुरुवातीलाच बॅंकेमध्ये नेमकी किती ठेवी आहे अशी विचारणा केली. ज्येष्ठ सदस्य डॉ. बबनराव तायवाडे, ऍड. मनमोहन वाजपेयी, विष्णू चांगदे आणि प्रविण उदापुरे यांनी प्रशासनावर प्रश्‍नांची फैरी झाडून राष्ट्रीयकृत बॅंकांकडेच ठेवी ठेवण्याचा अध्यादेश असताना, खासगी बॅंकांत कसे काय चालू खाते आणि ठेवी कशा काय? ठेवण्यात आल्यात असा प्रश्‍नही उपस्थित केला. डॉ. तायवाडे यांनी प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याची मागणी केली. मात्र, ही मागणी कुलगुरूंनी फेटाळून लावत, सिनेट सदस्य आणि चार्टड अकाऊंटंट जगदीश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती लावण्याची घोषणा केली. 

विद्यापीठाच्या 191 कोटींच्या ठेवी 
सिनेट सदस्यांनी चर्चेदरम्यान विद्यापीठाच्या येस बॅंकेत नेमकी किती रक्कम आहे, याची विचारणा केली. यावरुन वित्त व लेखा अधिकारी डॉ. राजू हिवसे यांनी सभेच्या शेवटी जवळपास 191 कोटी रुपयाच्या ठेवी येस बॅंकेत असून चालू खात्यात 1 ते 2 कोटी असल्याची माहिती दिली. यावेळी पैसे मिळविण्यासाठी विद्यापीठाकडून रिझर्व्ह बॅंकेकडे पत्रव्यवहार करण्यात येईल असेही ते म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आश्रमशाळांना युद्धाची झळ, गॅस तुटवड्याचा १८ हजार विद्यार्थ्यांना फटका; भोजन व्यवस्थेसमोर मोठे संकट

नाना पाटेकर ते नसीरुद्दीन शाह, एमएक्स प्लेयरवर २०२६ मध्ये येणार १५० नवीन शो; सगळे पाहता येणार फ्री

‘कुरळे ब्रदर्स’ची धमाल आता घरबसल्या! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ आता ओटीटीवर, कधी कुठे पाहाल?

नागपूरमध्ये ९० टक्के मोबाईल टॉवर अनधिकृत? खळबळजनक आरोपानंतर राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, आणणार नवं धोरण!

LPG Crisis: दररोज ७५ लाख बुकिंग; तरीही गॅस तुटवडा नाही, साठेबाजी आणि काळाबाजारावर लगाम; केंद्राने दिले कडक निर्देश

SCROLL FOR NEXT