परीक्षाच्या तारखा जाहीर झाल्या असल्या तरी अद्यापही वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले नाही. यामुळे अभ्यास कसा करावा याचे नियोजन विद्यार्थ्यांना करणे कठीण झाले आहे. 
नागपूर

नागपूर विद्यापीठाचा अजब कारभार! केवळ परीक्षांच्या तारखांची घोषणा; विद्यार्थ्यांना वेळापत्रकाची प्रतीक्षा 

मंगेश गोमासे

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने हिवाळी २०२० च्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या. त्यानुसार २० मार्चपासून लेखी परीक्षांना प्रारंभ होणार आहे. मात्र, परीक्षाच्या तारखा जाहीर झाल्या असल्या तरी अद्यापही वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले नाही. यामुळे अभ्यास कसा करावा याचे नियोजन विद्यार्थ्यांना करणे कठीण झाले आहे.

विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत परीक्षेच्या तारखांसंदर्भात निर्णय घेण्यात आला. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम, तृतीय आणि पाचव्या तसेच सातव्या आणि नवव्या सत्राच्या परीक्षा घेण्यात येणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षा ८ ते २० मार्चदरम्यान तर लेखी परीक्षा २० मार्च ते ३० एप्रिलदरम्यान घेण्यात येतील. सुमारे अडीच लाख विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. 

चार टप्प्यांत परीक्षा घेण्यात येईल. पहिल्या टप्प्यात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या तर द्वितीय सत्रात उपांत्य वर्षाच्या परीक्षा घेण्यात येतील. तिसरा टप्पा हा प्रथम वर्षाच्या परीक्षांचा असेल तर उरलेल्या सर्व सत्रांच्या परीक्षा या अखेरच्या म्हणजे चौथ्या टप्प्यात घेण्यात येणार आहेत. मात्र, या परीक्षांचे वेळापत्रक अद्यापही जाहीर करण्यात आलेले नाही. 

दहा दिवसांवर परीक्षा आल्या असतानाही वेळापत्रक न आल्याने विद्यार्थ्यांचे नियोजन बिघडले आहे. विद्यार्थ्यांना प्रत्येक पेपरची तारीखं माहिती झाल्यास त्याचे नियोजन केले जाते. मात्र, विद्यापीठाकडून अद्यापही वेळापत्रक न दिल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

ऑनलाइनच होणार परीक्षा

पदवी आणि पदव्युत्तर अशा दोन्ही अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑनलाइन स्वरुपात घेण्यात येणार आहेत. पदवी परीक्षा ऑनलाइन आणि बहुपर्यायी स्वरुपात होतील. तर प्रश्नपत्रिका विद्यापीठस्तरावर काढले जातील. ज्या विषयांकरिता अत्यंत कमी विद्यार्थी आहेत तेथे ऑफलाइन परीक्षा घेतली जाऊ शकते. यावेळी ऑनलाइन परीक्षा कुठली कंपनी घेणार याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 तोंडावर असताना जसप्रीत बुमराह बंगळुरूतील CoE मध्ये दाखल ! मुंबई इंडियन्सला धक्का बसणार?

माहेरी गेलेल्या पत्नीला एकटं गाठून पतीने केला जीवघेणा हल्ला, घरात रक्ताचा सडा; फरार पतीचा शोध सुरू

Cancer Care Support: डॉक्टरांच्या मते सुरुवातीच्या टप्प्यातील कर्करोग पुन्हा उद्भवू शकतो; अशा वेळी 'केअरगिव्हर' म्हणून तुमची जबाबदारी काय?

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये टेम्पो दुचाकीवर आदळून एकाचा मृत्यू

कूलिंग चेंबरमध्ये स्फोटानंतर इमारत कोसळली, ९ कामगारांचा मृत्यू; माजी आमदाराच्या मालकीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दुर्घटना

SCROLL FOR NEXT