nagpur university technology park will develop rural area 
नागपूर

विद्यापीठाचे 'टेक्नॉलॉजी पार्क' करणार ग्रामविकास, स्थानिक उत्पादन विकसित करण्यावर भर

मंगेश गोमासे

नागपूर : विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी आणि संशोधनात त्यांचा कल वाढावा यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने टेक्नॉलॉजी पार्क'ची निर्मिती केली. आता या 'टेक्नॉलॉजी पार्क'मधून ग्रामीण भागातील विकासावर भर देण्यात येणार आहे. 

विद्यापीठात ४० हून अधिक विभाग आहेत. या विभागाच्या माध्यमातून विविध प्रकल्पातून संशोधन केले जाते. मात्र, हे संशोधन विभागापुरतेच मर्यादित असतात. अनेक प्रकल्प हे पेटंट झाल्यावरही समोर येत नसल्याचे चित्र दिसून येते. या सर्व तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी विद्यापीठात २०१० पासून 'टेक्नॉलॉजी पार्क'ची निर्मिती करण्यात आली. यानंतर त्याकडे बरेच दुर्लक्ष झाले. गेल्या पाच वर्षांत टेक्नॉलॉजी पार्कला एक ते दीड लाखांचा निधी देत, त्यातून विद्यापीठातील विविध विभागाच्या विद्यार्थ्यांना जगातील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती देणे आणि विविध तंत्रज्ञानांवर पेटंट कसे फाईल करावे? याबाबतही माहिती देणे सुरू करण्यात आले. मात्र, अद्यापही विद्यापीठात संशोधन ज्या गतीने व्हायला पाहिजे, त्या गतीने होताना दिसून येत नाही. 

नवे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी या विभागाला ग्रामीण समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने काम करण्यावर भर देण्याचे ठरविले आहे. यानुसार ग्रामीण भागाचा सामाजिक, आर्थिक विकास करण्याच्या दृष्टीने काम करणार आहे. यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील कृषी उत्पादनांना विकसित करणे, त्यावरील प्रक्रिया उद्योगाबाबतची माहिती देणे आणि त्याला आवश्यक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे याचा समावेश करण्यात आला आहे. विद्यापीठ स्तरावर कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी स्वतः याकडे लक्ष घालणार असल्याचे समजते. येत्या काहीच दिवसात टेक्नॉलॉजी पार्कच्या माध्यमातून या संकल्पनेवर काम करण्यास सुरुवात होणार आहे. 

टेक्नॉलॉजी पार्कद्वारे ग्रामीण विकासाच्या दृष्टीने भर देण्याच्या अनुषंगाने लवकरच कामास सुरुवात करण्यात येईल. यातून ग्रामीण भागाचा सामाजिक आर्थिक विकास साधण्यास मदत होईल, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी सांगितले.

संपादन - भाग्यश्री राऊत
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj and Uddhav Thackeray: "मोदींना विद्यार्थ्यांशी बोलायला कमीपणा वाटतो का?"; राज-उद्धवांचा सरकारवर घणाघात, 26 जुलैला मुंबईत मोर्चा

MSEDCL Officer Arrested : 2 हजारांची लाच महावितरण अधिकाऱ्याला पडली महाग! ACB ची भुसावळमध्ये धाड; अतिरिक्त कार्यकारी अभियंता अटकेत

Latest Marathi Update : वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रमुख सुजात आंबेडकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Delhi Protest: आई, मला खूप मारलेय! दिल्लीतील आंदोलनात नागपूरच्या तरुणाईचा हुंकार; मारो सर, मारे असे म्हणत पोलिसांचा मार केला सहन

तंबाखू नियंत्रणाच्या नियमांत होणार मोठा बदल? FDAच्या निर्णयामुळे भारतात खळबळ, तज्ज्ञांची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT