exam
exam eSakal
नागपूर

परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांचे ट्रॅकींग, विद्यार्थ्यांच्या हालचालीवर नजर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा सुरू आहेत. परीक्षा सुरू करण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याच्या हालचालीवर नजर ठेवण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी दिली होती. त्यानुसार परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांचे ट्रेकिंग सुरू असून तसा डाटा विद्यापीठाकडे तयार असल्याची माहिती डॉ. चौधरी यांनी दिली. त्यात कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा २५ मार्चपासून सुरू झाल्यात. यावेळी प्रथमच परीक्षा संकेतस्थळावरुन (वेबबेस्ड) घेण्यात आली. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांना संगणक वा कोणत्याही अ‌ॅन्ड्राईड मोबाईलवर पेपर देता येणे शक्य झाले. कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी 'प्रॉक्टोरिंग'चीही व्यवस्था करण्यात आली. त्यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांना परीक्षा देताना, कॅमेरा चेहऱ्यावर असणे आवश्यक आहे. कुठलाही आवाज न करणे, न हलता परीक्षा देणे आदी सूचनांचा समावेश होता. विद्यापीठाच्या दाव्यानुसार ऑनलाइन पोर्टलवर सर्व्हिलन्स सिस्टीम अ‌ॅक्टिव्ह करण्यात आली. ज्यामुळे फोन वा संगणकात असलेल्या कॅमेरा आणि माईकमुळे त्या विद्यार्थ्यांच्या आजूबाजूचा आवाज आणि व्हीडिओ टिपता येणे शक्य झाले. त्यासाठी विद्यार्थ्यांना सेल्फी कॅमेरा ऑन करण्‍याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेदरम्यान हालचाल केल्यास त्याच्या हालचालीचा डाटा सर्व्हर सिस्टीममध्ये जमा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यांचा डाटा विद्यापीठाकडे जमा आहे. त्यामुळे आता त्याची माहिती घेत, यामध्ये आढळून आलेल्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचा विचार विद्यापीठ करीत आहे. त्यावर अद्याप निर्णय झाला नाही. मात्र, तसे संकेत विद्यापीठाने दिले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या परीक्षेत कुठल्याच प्रकारचे ट्रेकिंग वा कारवाई न झाल्याने विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेसाठी मागणी केली होती हे विशेष.

परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे ट्रॅकिंग करण्यात आले आहे. त्याची तपासणी करून कॉपी करणाऱ्यावर कोणती कारवाई करायची याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
- डॉ. सुभाष चौधरी, कुलगुरू.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT