Unicef sakal
नागपूर

Nagpur : संघर्षांमध्ये बळी बालहक्कांचा ! ‘युनिसेफ’चा अहवाल; हजारो बालकांचे भवितव्य अंधारात

संघर्षग्रस्त देशांमध्ये बालकांना विविध सशस्त्र गटांमध्ये ओढले जाते, हिंसाचारात त्यांचा मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात. मुलींनाही अपहरण आणि लैंगिक अत्याचारांना सामोरे जावे लागते.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur - जगभरात विविध ठिकाणी सुरु असलेल्या संघर्षामुळे प्रचंड जीवित आणि वित्त हानी होण्याबरोबरच या प्रदेशांमधील बालकांच्या हक्कांचाही प्रचंड प्रमाणात भंग होत असल्याचे ‘युनिसेफ’ने आपल्या अहवालात म्हटले आहे.

इस्राईल, पॅलेस्टाइन, काँगो आणि सोमालिया या देशांमध्ये किशोरवयीन मुलांचे सर्वाधिक नुकसान होत असल्याचे ‘युनिसेफ’ने म्हटले आहे.

संघर्षग्रस्त देशांमध्ये बालकांना विविध सशस्त्र गटांमध्ये ओढले जाते, हिंसाचारात त्यांचा मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात. मुलींनाही अपहरण आणि लैंगिक अत्याचारांना सामोरे जावे लागते. याशिवाय शाळा आणि रुग्णालयांवरही हल्ले होतात, ही बाब ‘युनिसेफ’ने अहवालात निदर्शनास आणून दिली आहे.

या सर्व घटना म्हणजे बालहक्कांचा भंग असल्याचेही ‘युनिसेफ’ने म्हटले आहे. ‘युनिसेफ’चे उप कार्यकारी संचालक ओमर अब्दी यांनी हा अहवाल संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीमध्ये सादर केला. या अहवालानुसार, २०२२ या वर्षात बालहक्कांचा गंभीर भंग झाल्याच्या २७ हजारहून अधिक घटनांची नोंद झाली आहे.

आतापर्यंतची ही सर्वांत मोठी संख्या आहे. मागील वर्षी अशा प्रकारच्या जवळपास २४ हजार घटना नोंदल्या गेल्या होत्या. जगभरात एकूण २६ ठिकाणी अत्यंत गंभीर स्वरुपाचे संघर्ष सुरु असल्याचे अहवालात म्हटले आहे. अहवाल तयार झाल्यानंतर उद्भवलेल्या संघर्षांबाबतही ओमर अब्दी यांनी माहिती दिली.

‘‘सुदानमध्ये सुरु असलेल्या संघर्षात दहा लाखांहून अधिक मुले विस्थापित झाली असून हजारो मुले मारली गेली आहेत. पॅलेस्टीनी बालकांनाही संघर्षाला सामोरे जावे लागत असून त्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. बालकांचे आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचे आश्‍वासन अनेक देश देत असले तरी अनेकांकडून ते आश्‍वासन पाळले जात नाही,’’ अशी खंत अब्दी यांनी व्यक्त केली.

बालहक्क भंगाच्या घटना

(२०२२)

हक्कभंग - २७१८०

पीडित मुले - १८,८९०

मृत्यू/जखमी- ८,६२०

सशस्त्र गटात भरती - ७,६२२

अपहरण - ३,९८५

लैंगिक अत्याचार - १,१६५

शाळांवर हल्ले - १,१६३

रुग्णालयांवर हल्ले - ६४७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई संकटात असताना झालेला कोविड सेंटर घोटाळा, सत्तेचा गैरवापर अन् नियमांचं उल्लंघन

Jalgaon Municipal Election जळगावात ठाकरे गटाची सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष मदत? प्रवीण माळी यांच्या निर्णयाने खळबळ

MPSC Success Story: संघर्ष पाचवीलाच... तरी केदार गरड बनला क्लासवन अधिकारी; एमपीएससीत राज्यात प्रथम, परिस्थितीवर मात करत यशाला गवसणी!

Nitesh Rane : शहराचे नाव बदलण्याचे षड्‍यंत्र; मंत्री नीतेश राणेंची शिवसेना यूबीटीवर टीका

Viral Video : तरुणीची मदत करणे तरुणाला चांगलेच पडले महागात, तुम्ही देखील 'ही' चूक करु नका; पाहा नेमकं काय घडलं ?

SCROLL FOR NEXT