attack on police
attack on police  
नागपूर

"तू ज्यादा पोलिस की नोकरी बजा रहा क्‍या"?, नागपूरच्या युवकांनी कायदा घेतला हातात...

सकाळवृत्तसेवा

नागपूर : रस्त्यावर घोळके करून उभ्या राहणाऱ्या युवकांच्या टोळीला घरी जाण्यास सांगितल्यामुळे टोळक्‍यांनी पोलिस कर्मचाऱ्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी बेलतरोडी परिसरात घडली. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी तीन जणांना अटक केली.

आजन आशिक सय्यद (19), अर्श आशिक सय्यद (21) आणि राज अकुंश नेवारे (19) तीनही रा. राजारामनगर, चिंचभवन अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कलम 144 लागू असल्यामुळे कुणालाही घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.

पोलिस कर्मचाऱ्याला जबर मारहाण
पोलिस लाऊडस्पिकरवरून याबाबत सतत घोषणा देत आहेत. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई देखील केली आहे. परंतु, विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर त्याचा काहीच फरक पडत नाही. अनेक जण काम नसतानाही परिसरात फिरताना दिसून येतात.
 
सोमवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास बेलतरोडी पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलिस शिपाई सूरज निंबाळकर (36) हे राजारामनगरात पॅट्रोलिंग करीत होते. त्यावेळी तीनही आरोपी हे कोरोना आजारासंदर्भात काही काळजी न घेता रस्त्यावर फिरताना मिळून आले. शिपाई सूरजने त्यांना समजावून घरी जाण्यास सांगितले असता आरोपींनी "तू ज्यादा पोलिस की नोकरी बजा रहा क्‍या' असे बोलून जोरजोरात ओरडून हातबुक्‍क्‍यांनी आणि दगडाने मारून जखमी केले. त्याचप्रमाणे शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी सूरजच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तिघांनाही अटक केली. 

चल ना..घूम के आते हैं ! 
घरात राहून कंटाळा आल्याचे सांगून काही युवक दुचाकी घेऊन घराबाहेर पडतात. चौकात उभ्या असलेल्या मित्रांसह "चल ना, घूम के आहे हैं. कुछ नही होता.' असे म्हणून केवळ फेरफटका मारण्यासाठी युवक घराबाहेर पडतात. धूम स्टाईल बाईक चालविणे किंवा जोरजोरात किंचाळणे असे प्रकार युवक करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT