attack on youth 
नागपूर

असंवेदनशीलतेचा कळस नुसता, गुंड मारत राहिले पण कोणीच बचावासाठी सरसावला नाही

सकाळवृत्तसेवा

नागपूर : अनेकदा आपल्या अवतीभोवती छोट्या-मोट्या घटना घडत असतात. त्यापैकी काही घटना आपल्या मध्यस्तीमुळे टाळता येऊ शकतात. मात्र आपण सर्वच प्रत्येक वेळी दुर्लक्ष करतो आणि एकादी मोठी घटना घडून जाते. अशीच एक घटना नुकतीच नागपुरात घडली. यावेळेस देखील नागरिकांनी असंवेदनशीलता दाखवली अन् अनर्थ घडला...

पानठेल्यावर उभ्या असलेल्या दोघांनी डोळे वटारून बघितल्याच्या अगदी क्षुल्लक कारणातून एका युवकाचा भरचौकात चाकूने भोसकून खून केला. ही थरारक घटना शुक्रवारी सायंकाळी सात वाजता हुडकेश्‍वरमध्ये घडली. रवींद्र राधेश्‍याम भोंगाडे (वय 22, सिद्धेश्‍वरीनगर, पिपळा रोड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. हुडकेश्‍वर पोलिसांनी चार तासांत दोन्ही आरोपींना अटक केली. आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास रामदास भलावी यांचा मृत्यू झाल्यामुळे रवींद्र भोंगाडे हा त्यांच्या घरी मंडप टाकण्याचे काम करीत होता. दरम्यान, लाइट गेली. त्यामुळे तो सिद्धेश्‍वरीनगरातील एका पानठेल्यावर खर्रा विकत घेण्यासाठी गेला. पानठेला चालकाशी थोडावेळ गप्पा केल्यानंतर तेथे आरोपी दिलीप हिरालाल उईके (रा. सिद्धेश्‍वरनगरी, पिपळा रोड) आणि अविनाश भोसले हे दोघे आले. दोघांनीही पानठेल्यावर खर्रा मागितला. दरम्यान, पानठेल्यावर उभा असलेल्या रवींद्र भोंगाडे याने दोघांकडे बघितले. दिलीपने त्याला "काय बघतोस रे', असे विचारले. त्यावर रवींद्रने काढता पाय घेत "काही नाही' म्हणून विषय मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दिलीप आणि अविनाशने रवींद्रला थांबवले. "माझ्याकडे डोळे वटारून काय बघत होतास', असा जाब विचारला. रवींद्रने वाद घालून "जा तुला बघत होतो', असे प्रत्युत्तर दिले. त्यामुळे चिडलेल्या दिलीप आणि अविनाशने रवींद्रला लाथाबुक्‍क्‍यांनी मारायला सुरुवात केली. रवींद्र जीव वाचविण्यासाठी पळायला लागला.

डोळे वटारून बघितल्याचे कारण
दोघांनीही त्याचा पाठलाग करून त्याला खाली पाडून पोटावर, छातीवर आणि पाठीवर चाकूने सपासप वार करून खून केला. रवींद्र रक्‍ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर दोघांनीही घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी राधेश्‍याम भोंगाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्‍वर पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला. हुडकेश्‍वर पोलिसांनी चार तासांत दोन्ही आरोपींना नागपुरातून ताब्यात घेतले. रवींद्र हा सेंट्रिंगची कामे करीत होता. त्याचा लहान भाऊ शिक्षण घेत आहे. तरुण मुलाच्या मृत्यूमुळे वडील राधेश्‍याम यांची प्रकृती खराब झाली असून, त्यांना मेडिकलमध्ये उपचार सुरू आहे. 

नागरिकांनी घेतली बघ्याची भूमिका 
आरोपी पळाल्यानंतर नागरिकांनी जखमी रवींद्रला मेडिकलमध्ये दाखल केले. तसेच पोलिसांनाही फोन केला. पोलिस लगेच घटनास्थळावर पोहोचले. जोपर्यंत रवींद्र रक्‍ताच्या थारोळ्यात पडत नाहीत, तोपर्यंत आरोपींनी वार केले. मात्र, तोपर्यंत कुणीही आरोपींना अडविण्याची हिंमत दाखवली नाही. काहींनी मोबाईलने शूटिंग केले, तर काहींनी थेट घराकडे पळ काढला. नागरिकांनी बघ्याची भूमिका घेतल्यामुळे रवींद्रचा बळी गेला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT