corona patient 
नागपूर

अहवाल 'निगेटिव्ह' आला अन् हा पठ्ठ्या शहरभर फिरला... मग

सकाळवृत्तसेवा

नागपूर : गेल्या अनेक दिवसांपासून मेडिकलमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णाने अहवाल 'निगेटिव्ह' आल्यानंतर झालेल्या सुटीमुळे आनंदाच्या भरात शहरभर धूडघूस घातला. सुटी झाल्यानंतर 14 दिवस विलगीकरणात राहण्याचा डॉक्‍टरांचा सल्लाही धुडकावत त्याने मित्रांच्या भेटीगाठी घेत त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचेही आरोग्य धोक्‍यात आणले. त्यामुळे या रुग्णाबाबत संतापाची लाट निर्माण झाली आहे.

कोरोनाबाधित आढळून आल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून मेडिकलमध्ये उपचार घेणाऱ्या 32 वर्षीय तरुणाला मेडिकल प्रशासनाने  शुक्रवारी रात्री सुटी दिली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे शुक्रवारी रात्री अकरा वाजता सुटी देण्यात आली होती. या रुग्णाला निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्रही देण्यात आले. त्याला मेडिकल प्रशासनाने घरापर्यंत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची गरज होती. परंतु मेडिकल प्रशासनाकडून यात दिरंगाई झाली अन्‌ या उपचारानंतर बरा झालेल्या रुग्णाचे चांगलेच फावले. त्याने मित्राला दुचाकी घेऊन बोलावले. त्याच दुचाकीने तो मित्रासह मोमीनपुऱ्यात पोहोचला. येथे त्याचे जणू युद्ध जिंकल्याप्रमाणे जोरदार स्वागत करण्यात आले. याबाबत त्यानेच सोशल मिडियावर काही छायाचित्र पोस्ट केले आहे.

मित्रांना भेटून त्यांचेही वाढवले संकट 
एवढेच नव्हे या तरुणाने आमदार निवासातील विलगीकरणात असलेल्या पत्नीचीही भेट घेतली. यशस्वी उपचारानंतरही 14 दिवस विलगीकरणात राहण्याचे बंधनकारक असताना या तरुणाने मित्र, पत्नी आदीच्या भेटी घेत जणू कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा होणारच नाही, या आवेशात शहरभरात प्रवास केला अन्‌ इतरांनाही धोका निर्माण केला.

त्यामुळे या तरुणाविरोधात संतापाची लाट निर्माण झाली. कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात कालच रुग्णालयातून परतल्यानंतर बिनधास्त दुचाकीने फिरून इतर नागरिकांनाही त्याची लागण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. उपचारानंतर 14 दिवस घरांमध्येच राहण्याचे बंधनकारक असल्याचे यापूर्वी निगेटिव्ह अहवाल आलेल्या खामल्यातील एकाने नमूद केले. त्यामुळे मोमीनपुऱ्यातील या तरुणाने हे बंधनही झुगारून लावले. 

मेडिकलचे अधिष्ठाता, जिल्हाधिकारी सुटीबाबत अनभिज्ञ 
कोरोनाबाधित रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला सुटी देण्यापूर्वी मेडिकलचे अधिष्ठाता व वैद्यकीय अधिक्षकाला माहिती देणे आवश्‍यक आहे. परंतु या तरुणाला सुटी देण्याबाबतचा निर्णय या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून गोपनीय ठेवण्यात आला. एवढेच नव्हे जिल्हाधिकाऱ्यांनाही माहिती देण्यात आली नाही. या सर्व अधिकाऱ्यांना माहिती न देताच या रुग्णाला सुटी देण्यात आली. रात्री अकरा वाजता सुटी देण्याचा आततायीपणा मेडिकलच्या औषध वैद्यकशास्त्र विभागाने का दाखविला? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

पोलिसांनी घेतले ताब्यात 
उपचारानंतर सुटी झाल्यामुळे आनंदाच्या भरात या तरुणाने सोशल मिडियावर निगेटिव्ह अहवाल पोस्ट केला. एवढेच नव्हे दुचाकीने आणखी दोन मित्रांसोबत फिरत असल्याचा तसेच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींपुढे बोलतानाचे फोटोही त्याने पोस्ट केले. या घटनेने नागरिकांचा त्याच्याविरोधातील वाढता संताप व सोशल मिडियावरील पोस्टमुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या तरुणाला पोलिसांनी आमदार निवासातील विलगीकरण केंद्रात पुन्हा पाठवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon ZP Election : आरक्षणाचा पेच कायम; जिल्‍हा परिषद निवडणुका दिवाळीनंतरच? सर्वोच्‍च न्‍यायालयात सुनावणीने लांबणीवर, नव्‍याने निघणार आरक्षण

Latest Marathi News Live Update : शरद पवारांना डिस्चार्ज, पुढचे काही दिवस पुण्यातील घरी विश्रांती घेणार

T20 World Cup : कदाचित नवा चेंडू टाकेन; पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबाबत वरुण चक्रवर्तीचे भाष्य

भाजप आमदाराच्या कार्यालयात बॅगेत आढळलं पिस्तुल, कुणी आणि कशासाठी आणलं?

Valentine Day 2026: व्हॅलेंटाईन डे नंतर कोणते 'डे' येतात? कसा साजरा केला जातो, जाणून घ्या लिस्ट

SCROLL FOR NEXT