Nagpur Zilla Parishad 
नागपूर

नागपूर : स्‍थायीची शेवटची बैठक वादळी!

शिवसेना सदस्य विरोधी बाकावर : विरोधक आक्रमक

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक सोमवारी होणार आहे. विद्यमान सत्ताधाऱ्यांची ही शेवटची बैठक असणार आहे. राज्यातील सत्तांतरानंतर विरोधकही आक्रमक भूमिका घेण्याच्या पवित्र्यात असून शिवसेना सदस्यही विरोधी बाकावर राहणार आहे. त्यामुळे स्थायी समितीची शेवटची सभा वादळी ठरण्याचे संकेत आहे.

जिल्हा परिषदेतील विद्यमान पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. अध्यक्ष व उपाध्‍यक्ष १७ जुलैला पायउतार होतील. उपाध्यक्ष पदासाठी १६ जुलैला निवडणूक होत आहे. आरक्षण न निघाल्याने अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर पडली आहे. मागील सभेत अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. यातील काही मुद्यांवर अद्याप कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात येते. निधी वाटपावर सदस्यांमध्ये खदखद आहे. राज्यात संत्तातर झाल्याने भाजपच्या सदस्यांमध्ये ऊर्जा आली आहे.

शिवसेनेचे एकमेव सदस्यही विरोधी बाकावर गेलेत. कॉंग्रेसमधील काही सदस्यांना पदाची अपेक्षा आहे. पक्षाकडून पद मिळण्याचे संकेत न मिळाल्यास त्यांच्याकडून बंडखोरी होण्याची चर्चा आहे. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेने तसेच अपेक्षा बाळगून असलेल्या सदस्यांमध्ये भेटीगाठी वाढल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. राज्यात बदललेले समीकरण व जिल्हा परिषदेत बदल घडविण्याचा होत असलेला प्रयत्नाचा प्रत्यक्ष परिणाम सोमवारच्या बैठकीत उमटण्याचे संकेत आहे. नुकतेत एका निवृत्त अधिकाऱ्याच्या हकालपट्टीचे पत्र गाजत आहे. शिवाय लघुसिंचन विभागाकडून होत असल्याने अनियमितताही विरोधकांच्या अजेंड्यावर राहणार असल्याचे सांगण्यात येते.

विद्यार्थी गणवेश, शिक्षकांच्या सुट्याही गाजणार असल्याचे समजते. राष्ट्रवादीची भूमिकाही तटस्थ राहण्याची शक्यता आहे. सत्ताधाऱ्यांमधील एका गटसोबत पदाची अपेक्षा असलेल्यांकडून चाचपणी होत आहे. त्यामुळे काही काही पदाधिकाऱ्यांचे विभाग विरोधकांच्या रडावरून दूर राहणार असल्याचे समजते. ही शेवटची बैठक असल्याने सत्ताधाऱ्यांची चांगलीच दमछाक होण्याचे संकेत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT