Nitin gadkari sakal
नागपूर

Nagpur: स्वातंत्र्यदिनानिमित्त आल्या इलेक्ट्रिक बस, गडकरींनी दाखवला हिरवा झेंडा

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शहराला १७ इलेक्ट्रिक बस मिळाल्या

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महापालिकेला १७ इलेक्ट्रिक बस मिळाल्या असून आजपासून श्रीकृष्णनगर मार्गावर बस सुरू करण्यात आली. तिकिटासाठी ॲप तयार करण्यात येत असून नागरिकांना कार्डचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने बस सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी नमुद केले.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शहराला १७ इलेक्ट्रिक बस मिळाल्या. या बसचे सोमवारी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे, अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीना, राम जोशी, माजी परिवहन सभापती बंटी कुकडे व्यासपीठावर उपस्थित होते.

चार्जिंग केंद्र वाढविणार

याशिवाय सद्यस्थितीत इलेक्ट्रिक बस चार्जिंगसाठी एकच वर्धमाननगर येथील एकच केंद्र आहे. येथे सहा चार्जिंग पॉईंट आहेत. एकदा बस चार्जिंग केल्यानंतर दोनशे किमीपर्यंत धावते. एका बसला चार्जिंगसाठी दोन तासांचा अवधी लागतो. १७ बससाठी चार्जिंग स्टेशन पुरेसे असले तरी ते एकाच ठिकाणी आहे. त्यामुळे वर्धमाननगरवरून चार्जिंग होऊन शहराच्या इतर भागात जाण्यासाठी या बसला मोरभवन येथे यावे लागणार आहे. यातच अधिक वेळ जाणार आहे. शहरात आणखी चार्जिंग स्टेशन वाढविण्याची गरज आहे. पंतप्रधान योजनेतून १४५ बस आणखी मिळणार आहेत. वाडी येथे तसेच वाठोडा येथे १८ एकरात चार्जिंग स्टेशन प्रस्तावित आहे. महापालिकेला चार्जिंग स्टेशनसाठी लवकर पाउले उचलावी लागणार आहे.

कार्ड वापरूनच प्रवास शक्य

या बसच्या तिकिटासाठी नागरिकांना कार्डचा वापर करावा लागणार आहे. सध्या एकाच बससाठी ही सुविधा करण्यात आली आहे. या बसमधून प्रवासासाठी ॲप तयार करण्यात आले आहे. बसमध्ये वाहक राहणार नाही. डिजिटल कॅशने व्यवहार होणार आहे. नागरिकांना कार्ड देण्यात येणार असून ते रिचार्ज करावे लागणार आहे. बसमध्ये चढताना ॲपमध्ये कार्ड टॉप इन करावे लागणार आहे. जिथपर्यंत ज्यायचे आहे, तिथपर्यंतच्या तिकिटचे पैसे यातून कमी होईल. सर्वच बसमध्ये हे ॲप राहील. नागरिकांना कार्ड देण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल. त्या प्रक्रियेला नागपूरकर कसा प्रतिसाद देतात, यावरच इलेक्ट्रिक बसचे भवितव्य ठरणार आहे.

एकच बस सुरू

शहराला १७ बस मिळाल्या असल्या तरी आजपासून केवळ एकच बस सुरू करण्यात आली. मोरभवन ते श्रीकृष्णनगरपर्यंत या मार्गावर ही बस सुरू करण्यात आली. येत्या काही दिवसांत पाटणसावंगी, बुटीबोरी, बहादुरा, पिपळा फाटा, कन्हानपर्यंत या बस धावतील.

साध्या बसच्या दरातच प्रवास

इलेक्ट्रिक बसमधून प्रवासाचे तिकिटाचे दर साध्‍या बसएवढेच असल्याने नागरिकांवर भुर्दंड पडणार नाही, असे उपायुक्त व परिवहन व्यवस्थापक भेलावे यांनी सांगितले. प्रवाशांन डिजिटल कॅशचा वापर करावा लागणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही एक बस सुरू करण्यात आली. टप्प्याटप्प्याने इतरही बस सुरू करण्यात येईल, असेही भेलावे म्हणाले.

नागपुरात पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. नागपूर देशातील इतर राज्यांना पथदर्शक ठरणार आहे. पर्यावरणपूरक ई-बसेससाठी नागपूर महानगरपालिकेचे अभिनंदन. वायू, पाणी आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी मनपाने प्रयत्न करावे. कर्मचाऱ्यांनीही बस व्यवस्था फायद्याची करण्यासाठी प्रयत्न करावे.

-नितीन गडकरी,केंद्रीय मंत्री, रस्ते परिवहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS T20I : भारत-ऑस्ट्रेलिया पुढचा सामना केव्हा? जाणून घ्या तारीख, ठिकाण, वेळ अन् live streaming details

Devendra Fadanvis Sugarcane Protest : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न; कोल्हापुरात ऊस दरावरून आंदोलन चिघळले, Video

Latest Marathi News Live Update : कल्याणातील रिंगरोड टप्पा ३ च्या कामाला वेग,आठ महिन्यांत पूर्णत्वाचा निर्धार

किती तो वेंधळेपणा! गाडीत बसली, स्टेअरिंग हातात घेतलं पण लगेच खाली उतरली; तेजश्रीचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल हसू

Diabetes Breakthrough Discovery: आता रक्तातूनच समजणार डायबिटीजचा धोका; आयआयटी मुंबईतील संशोधकांचा शोध

SCROLL FOR NEXT