nana patole criticized modi government nagpur news  
नागपूर

'नानां'ची काठी थेट मोदी सरकारवर, केंद्रसरकारविरोधात संघर्ष

भाग्यश्री राऊत

नागपूर : देशपातळीवर अराजकता माजली आहे. केंद्रसरकारकडून मनमानी कारभार सुरू आहे. त्यामुळे अत्याचारी विचारधारेच्या विरोधात म्हणजेच मोदी सरकारच्या विरोधात माझी काठी चालेल, असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले. 'भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी', अशी नाना पटोलेंची भूमिका असते. त्यामुळे ही काठी नेमकी कोणावर चालणार? असा प्रश्न विचारला असता, त्यांनी हे वक्तव्य केले. आज एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

महाविकास आघाडीमधील आमच्या नेत्यांमध्ये समन्वय आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात बोलण्याचा प्रश्नच येत नाही. या देशात आणि राज्यात अत्याचार करणाऱ्यांना माझा विरोध आहे. भाजपच्या मनमानी कारभाराल विरोध आहे, असे नाना म्हणाले. 

दरम्यान, नाना पटोले यांनी गुरुवारी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. आता त्यांच्या नावाची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून अधिकृत घोषणा होईल. यासाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही. त्याचे चित्र आजच स्पष्ट होईल, असेही नाना म्हणाले. तसेच माझ्या पक्षाला राज्यात एक क्रमांकाचा पक्ष कसा बनवता येईल, याकडे मी लक्ष देणार आहे, असेही नाना म्हणाले.  

पक्षाची जे ठरलं आहे, त्यानुसार महाविकास आघाडीने चालावे. ते त्याप्रमाणे वागले नाहीतर त्यांना समजावून सांगणे माझे काम आहे, असेही नाना म्हणाले. तसेच विधानसभा अध्यक्ष असल्यामुळे त्यांचे हात बांधले गेले होते. मात्र, आता नाना भाजप सरकारवर तुटून पडणार आहेत, हे निश्चित.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT