Nana Patole warmly welcomed in Nagpur political news 
नागपूर

मी सांगतो, विरोधकांच्या काळजात धस्स झाले असेल

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : मोदी सरकारने शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे व कामगारांचे शोषण चालवले आहे. उद्योगधंदे उद्ध्वस्त केले आहेत. परवाच पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांचा अपमान केला. त्यांच्या जखमांवर मीठ चोळले. त्याचा हिशोब जनता आता मोदी सरकारकडून वसूल करणार आहे. शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे ठोकले. हा काय प्रकार आहे. यापूर्वी देशाने असा प्रकार बघितला नव्हता. जे कधीच घडले नाही येवढी क्रूरता मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत दाखवली आहे. सरकारची उलट गणणा आता सुरू झाली आहे, असे कॉंग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय विमानतळावर नाना पटोले यांच्या स्वागतासाठी हजारोच्या संख्येने नागरिक जमले होते. ही गर्दी बघून आजच विरोधकांच्या काळजात धस्स झाले असेल, असे पटोले म्हणाले. ही दीक्षाभूमी आहे. आज स्वयंस्फूर्तीने येथे हजारो लोक आले आहेत. येथे जमलेल्या लोकांचा जो उत्साह आहे, ही येत्या काळात महाराष्ट्रात होणाऱ्या परिवर्तनाची नांदी आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

नाना पटोले यांची कार्यशैली आक्रमक आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर ते नेहमीच स्वकीयांसोबतही भिडले आहेत. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरही ती आक्रमकता कायम असेल का, असे विचारले असता ते म्हणाले, जनतेच्या प्रश्‍नासाठी कॉंग्रेस नेहमीच आक्रमक राहील. जनतेला न्याय मिळवून देणे हे कॉंग्रेसचे ध्येय आहे. या देशाला स्वातंत्र्य कॉंग्रेसने मिळवून दिले आणि आज केंद्रातील सरकार परकीयांसारखी जनतेसोबत वागत आहे. त्यांच्या विरोधातही आक्रमक आंदोलन आता कॉंग्रेस करेल, असे ते म्हणाले.

वेगळा अर्थ काढत आहे

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मंत्रिमंडळात फेरबदल होणार हे निश्‍चित झाले आहे. आता नाना पटोले यांना ऊर्जा खाते मिळणार, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत विचारले असता, ऊर्जा खात मिळो न मिळो, मंत्रिपद मिळेल अथवा मिळणारही नाही. पण आज कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा संचारली आहे. राज्याच्या जनतेमध्येही नव्या ऊर्जेचा संचार झालेला दिसत आहे. त्या ऊर्जेची चर्चा आज चालली आहे. परंतु, लोक त्याचा वेगळा अर्थ काढत आहे, असे कॉंग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Crushing Season : १५ ऑक्टोबरपासूनचा गाळप हंगामाचा निर्णय रद्द करावा; विविध संघटनांची साखर आयुक्तांकडे मागणी

Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

Nagpur News : आई-बाबा मला माफ करा; तरुण अधिवक्‍त्याने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT