Nanded news esakal
नागपूर

Nanded : उत्खनन थांबवण्यात महसूल विभागाला अपयश

मुरुमाच्या उत्खननाला परवानगी देणे बंद

सकाळ वृत्तसेवा

नायगाव : हरित लवादाच्या एका निर्णयामुळे मागच्या सात महिण्यापासून मुरुमाच्या उत्खननाला परवानगी देणे बंद आहे. मात्र नायगाव तालुक्यात या बंदीचा कसलाही परिणाम झाला नसून दिवसरात्र मुरुमाचे अवैध उत्खनन चालूच आहे. महसूल विभागाच्या मुक समंतीने माफीयांनी मुरुमाचे बेफाम उत्खनन करुन पर्यावरणाचा प्रचंड ह्रास चालवला आहे.

यापूर्वी हे माफीया ५००ब्रासची परवानगी घेवून पाच हजार ब्रास उत्खनन करत होते, पण किमान ५०० ब्रास मुरुमाची रायल्टी तरी शासनाला मिळत होती. या मुरुमाच्या बेफाम उत्खननामुळे पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास होत असल्याचे प्रकरण हरित लवादाकडे गेले. त्यामुळे फेब्रुवारी २०२२ पासून मुरुमाच्या उत्खननावर बंदी घालण्यात आली. तेव्हापासून नांदेड जिल्ह्यात एकाही तालुक्यात मुरुम उत्खननाला परवानगी देण्यात आली नाही. परंतु नायगाव तालुक्यात एकही दिवस मुरुमाचे उत्खनन बंद झाले नाही.

तालुक्यात महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून डोंगर पोखरून मुरुमाचे अवैध उत्खनन होत आहे. त्याचबरोबर चार ते पाच कंत्राटदारांनीही हजारो ब्रास मुरुमाचे बेकायदेशीर उत्खनन केलेले आहे. याबाबत महसूल विभागाला परिपूर्ण माहिती असताना महसूलचे अधिकारी बघ्यांची भुमिका घेत असल्याने होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हासाचे त्यांना काहीच देणेघेणे नाही असेच दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

Lonar Lake Development: पर्यटकांना मिळणार लोणार सरोवराची वैज्ञानिक व ऐतिहासिक माहिती

Ichalkaranji : मला जगायचं नाही सोडा, महिला जीवनाला कंटाळून इचलकरंजी घाटावर गेली अन्...

Fake Currency: धाड परिसरात बनावट नोटा चलनात; पोलिस व बँक प्रशासनाकडून आवाहनः व्यापारी व नागरिकांन सतर्क राहावे

SCROLL FOR NEXT