naresh meshram family donate organ in nagpur 
नागपूर

मृत्यूच्या दारात असतानाही 'त्याने' दिले तिघांना जीवदान, १९ वर्षीय मुलीचा पुढाकार

केवल जीवनतारे

नागपूर : दक्षिणपूर्व मध्य रेल्वेत कार्यरत नरेश मेश्राम (४६) यांनी मंगळवारी (ता.५) मृत्यूला जवळ करताना यकृत आणि किडनी दान करीत तिघांना जीवनदान दिले. तर नेत्रदानातून दोघांच्या नजरेत उजेड पेरला. विशेष असे की, मेश्राम यांच्या १९ वर्षीय मुलीने अवयवदान करण्याचा निर्णय घेत समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. 

नरेश प्रेमलाल मेश्राम मूळचा गोंदिया जिल्ह्यातील मरार टोली येथील. ३० डिसेंबरला त्यांचा अपघात झाला. त्यांना रेल्वे रुग्णालयात दाखल केले. पुढे ३ जानेवारीला केअर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र, उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने दुसऱ्याच दिवशी (ता.४) मेंदूमृत असल्याचे कुटुंबाला कळविण्यात आले. दरम्यान, विणा वाठोरे, शुभांगी पोकले यांनी अवयवदानासाठी समुपदेशन केले. १९ वर्षीय मुलगी सुनिधी यांनी आई श्रीदेवी यांचे मत घेत अवयवदानाचा निर्णय घेतला. तातडीने ही माहिती विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी आणि सचिव डॉ. संजय कोलते यांनी अवयवदानाची प्रतीक्षा यादीचा शोध घेण्यात आला. त्यात न्यू ईरात एक रुग्ण यकृताच्या प्रतीक्षेत असल्याचे स्पष्ट झाले. न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये यकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेतून एकाला जीवनदान मिळाले.

६० वर्षीय महिला सुपर स्पेशालिटीत, २५ वर्षीय तरुण केअर रुग्णालयात किडनीच्या प्रतीक्षेत होते. सुपरमधील महिला सुदृढ नसल्याने मेडिट्रिनातील ३७ वर्षीय महिलेला किडनी दान केली. यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राहुल सक्सेना, डॉ. साहील बंसल यांच्यासह मेडिट्रिनाचे किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. शिवनारायण आचार्य, डॉ. अनघा कुलकर्णी, डॉ. रोहित गुप्ता, केअरमधील डॉ. अश्विनीकुमार खांडेकर, डॉ. रवी देशमुख, डॉ.एस. जे. आचार्य, डॉ. वेद यांनी किडनी प्रत्यारोपण केले. माधव नेत्रपेढीत नेत्रगोल दान करण्यात आले. यातून दोघांच्या डोळ्यांमध्ये प्रकाश पेरण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

कोरोनामुळे वर्षभर अवयवदान झाले नाही. मात्र आता काही प्रमाणात अवयवदान होऊ लागले आहे. मेंदूमृत व्यक्तीच्या अवयवदानातून अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या व्यक्तीला जीवनदान मिळू शकते. समाजाने अवयवदानासाठी पुढाकार घेतल्यास अनेकांचे प्राण वाचवण्यात यश मिळते. 
-डॉ. आनंद संचेती, हृदय प्रत्यारोपण तज्ज्ञ, नागपूर. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

Shirur Crime : पुणे–अहिल्यानगर महामार्गावर थरार; शिरूरजवळ तरुणावर कोयता-तलवारीने जीवघेणा हल्ला!

Shirur Extortion : “माझ्या एरियात काम करायचे असेल तर दोन लाख द्या”; शिरूरमध्ये कंत्राटदाराला धमकी देणारा तडीपार गुंड अटकेत!

IPL 2026 Auction live : Unsold खेळाडूसाठी काव्या मारनने मोजले १३ कोटी; सर्फराज खान CSKच्या संघात, पृथ्वी शॉ सर्वांना 'नकोसा'

Latest Marathi News Live Update : आयआयटी मुंबई मूड इंडिगो कार्यक्रमात विद्यार्थ्यांची तुफान गर्दी

SCROLL FOR NEXT