Navratri 2024 sakal
नागपूर

Navratri 2024 : आधार कार्ड बघूनच गरब्यात प्रवेश द्या,विश्व हिंदू परिषदेचे आवाहन

Nagpur News : नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषदेने गरबा आयोजन करणाऱ्यांना आवाहन केले आहे की लव्ह जिहाद रोखण्यासाठी गरब्यात प्रवेश करताना आधार कार्ड तपासा आणि श्रद्धा नसलेल्या व्यक्तींना प्रवेश न देण्याची व्यवस्था करा.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : लव्ह जिहाद सारखे प्रकार रोखण्यासाठी गरबामध्ये प्रवेश देताना आधार कार्ड तपासा, आणि प्रत्येकाच्या डोक्यावर टीळा लावा अशी मागणी विश्व हिंदू परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे.

गरबा हा श्रद्धेचा आणि भक्तीचा विषय आहे. फक्त नृत्य आणि इव्हेंट नाही. त्यामुळे गरबा आयोजनाच्या स्थळी देवीबद्दल श्रद्धा नसलेल्या, भक्ती नसलेल्यांनी प्रवेश दिला जाऊ नये. गरबा उत्सवात श्रद्धा नसताना, देवीबद्दल भक्ती नसताना ही अनेक इतर धर्मीय तिथे प्रवेश घेतात आणि हिंदू महिला आणि तरुणींची छेड काढतात.

पुढे लव्ह जिहाद सारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे गरबा आयोजन करणाऱ्या मंडळांनी आधीच काळजी घ्यावी असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी केली आहे.

विहिंपने गरबा उत्सव आयोजन करणाऱ्यांना मंडळांना संपर्क साधून तशी व्यवस्था करण्यास सांगितले आहे. गरबा उत्सवात येणाऱ्यांचे आधार कार्ड तपासणे आणि दरावरील व्यवस्थेसाठी आयोजन मंडळांकडे कार्यकर्ते नसल्यास विहिंप आपले कार्यकर्ते मदतीसाठी उपलब्ध करून देणार आहे. गेल्या काही वर्षांपासून गरबा सणात फक्त हिंदू धर्मीयांनाच प्रवेश देण्यात यावा अशी मागणी विहिंप आणि बजरंग दलाकडून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Development : पुण्याच्या प्रश्नांचा विधानसभेत आवाज, आमदारांकडून उपाययोजनांची मागणी; वाहतूक कोंडीसह अतिक्रमणे हटवावीत

Ashadhi Wari 2025: 'जो तरुण भाग्यवंत, नटे हरी कीर्तनात'; आधुनिक वाद्यांसह भारुडकार कृष्णा महाराज यांची भारुडसेवा

Gadchiroli Education: गडचिरोलीचे शिक्षणाधिकारी पोलिसांना शरण; बोगस शिक्षक पराग पुडकेचा प्रस्ताव केला होता मंजूर

ख्रिश्चन आक्रमक! आमदार पडळकरांचे ख्रिश्चन धर्माबद्दल अवमानकारक वक्तव्य; मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा

Pune News : आपत्तींमुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ; लष्करी अभियंत्यांच्या कामगिरीचेही कौतुक

SCROLL FOR NEXT