Navratri 2023 esakal
नागपूर

Navratri Festival 2023 : गजर जय अंबे जगदंबेचा; नऊ दिवस देवीच्या नऊ रुपांचा जागर

जगदंबा मातेवर भाविकांची विशेष श्रद्धा आहे. शहराच्या वैभवात आकर्षक देखावे दरवर्षीच भर घालतात.

सकाळ डिजिटल टीम

नागपूर - शक्तीचं, सृजनाचं, तेजाचं आणि निर्धाराचं प्रतिक असलेल्या देवीच्या नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. शहरातील दुर्गोत्सव मंडळात उत्साहपूर्ण वातावरण बघावयास मिळाले. ‘दुर्गे दुर्घटभारी तुजवीण संसारी...’, ‘उदे गं अंबे उदे...’, ‘जय माता दी...’, असा गजर करीत शहरातील आठशेपेक्षा जास्त सार्वजनिक मंडळात आदिशक्तीची मोठ्या भक्तीभावाने घटस्थापना करण्यात आली.

जगदंबा मातेवर भाविकांची विशेष श्रद्घा आहे. शहराच्या वैभवात आकर्षक देखावे दरवर्षीच भर घालतात. यंदाही परराज्यातील कलाकारांकडून देखावे विविध प्रकारच्या आकर्षक देखाव्यांची निर्मिती करण्यात आली आहे. प्राचिन मंदिरांच्या प्रतिकृती देखाव्यासह चलचित्र देखावे लक्षवेधक ठरणार आहे. शहरात आठशेपेक्षा जास्त दुर्गोत्सव मंडळात घटस्थापना करण्यात आली.

गजर जय अंबे जगदंबेचा

रविवारी वाजतगाजत ढोल ताशा, डिजे, पारंपरिक वाद्य, भजनी मंडळ, आदिवासी नृत्य, आकर्षक झाकींनी मिरवणूक काढण्यात आली. शहरातील सर्वच रस्त्यांनी मिरवणूक निघाल्याने रस्ते गर्दीने फुलून गेले होते. दुचाकी व चारचाकी वाहनांमुळे प्रमुख चौकातील वाहतूक ठप्प झाली होती. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी चौकाचौकांसह मिरवणुकीदरम्यान चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

ठिकठिकाणी ‘ज्योत’

शहरातील प्रमुख देवस्थानांसह विविध मंदिरांमध्ये ‘मनोकामना ज्योत’ लावण्यात आली आहे. यासाठी दुपारी मंदिरातील घटस्थापना झाल्यावर नागरिकांनी मनोकामना ज्योत लावून आपली मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी संकल्प सोडला. दरम्यान शहरातील विविध मंदिरांमध्ये भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचे दिसून आले.

कोराडीतील जगदंबा मंदिर

शहरात कोराडी येथील जगदंबा मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होताना दिसून येते. भाविकांच्या मनोकामना पूर्ण करीत असल्याचा भाविकांचा विश्‍वास असल्याने सकाळपासून या ठिकाणी दर्शनासाठी रांगा लागल्याचे दिसून येत.

आग्याराम देवी

बसस्थानकापासून काही अंतरावर असलेल्या आग्याराम देवीचा मोठा इतिहास आहे. दरवर्षी शारदीय नवरात्राच्या निमित्ताने येथे भाविकांची गर्दी होताना दिसून येते. याही वर्षी या ठिकाणी नवरात्रोत्सवानिमित्त भव्य आयोजन केले असून मनोकामना ज्योतही प्रज्ज्वलीत केली आहे. आज सकाळपासूनच या ठिकाणी भाविकांनी गर्दी केली होती.

भवानी माता मंदिर

पारडी परिसरात असलेल्या भवानी माता मंदिर हे भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. जमिनीतून देवी प्रकट झाल्याची आख्ययिका आहे. त्यामुळे या देवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होत असते. त्यामुळे प्रशासनाकडून भाविकांसाठी विविध उपाययोजना केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT