navratri festival 2023 sanatan dharma article mata kalika temple adishakti jagar celebration Sakal
नागपूर

Navratri Festival 2023 : माँ कालंका मंदिरात होणार आदिशक्तीचा जागर

नवरात्रीच्या काळात कालंका देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा

शितलवाडी : रामटेकच्या माँ कालंका देवी मंदिरात स्थापित देवी काली हे महाकालीचे प्रतीक आहे. नवरात्रीच्या काळात कालंका देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. शहराच्या उत्तर टोकाला असलेल्या या मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी जोरात सुरू झाली आहे.

कालंका देवी मंदिर अतिशय प्राचीन राष्ट्रकूट काळातील आठव्या ते नवव्या शतकातील आहे. मंदिरात कालंक देवीची सुंदर चार फुटी संगमरवरी मूर्ती आहे. हे मंदिर वाकाटक काळात बांधल्याचे सांगितले जाते. संपूर्ण मंदिर वालुकामय पाषाणाने बांधले गेले आहे. मंदिराचे शिखर अर्धवर्तुळाकार पद्मक्षिणीने सजवलेले असून त्याचा आकार हत्तीच्या पाठीसारखा आहे. हे मंदिर प्राचीन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.

मंदिर समिती तयारीत व्यस्त

नवरात्रोत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर समितीचे अध्यक्ष मधुकर सहारे, अरुण पोकळे, सुधाकर सहारे, दिलीप देशमुख, अनिल भोरसले, अरविंद अंबागडे, रमेश कोठारी, चंद्रकांत ठक्कर, दयाराम रेवतकर, बबन क्षीरसागर, नथ्थू घरजाडे, दुर्गेश खेडगरकर, रितेश चौकसे, सुमित कोठारी, निर्भय घाटोळे, महेंद्र माकडे, रवी महाजन, वसंत डामरे यांच्यासह सेवक नवरात्रोत्सवाच्या तयारीत व्यस्त आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

G Ram Ji Bill: विरोधकांचा गोंधळ, घोषणाबाजी आणि कागदफाड... तरीही जी रामजी विधेयक लोकसभेत मंजूर; यात काय विशेष आहे?

Cameron Green: कॅमेरून ग्रीनच्या हाती TAX कापून किती रक्कम येणार? आधीच Welfare Fund मुळे ७.२० कोटी कापले जाणार...

Liam Livingstone ला १३ कोटी देण्याची खरच गरज होती का? काव्या मारनच्या निर्णयावर होतेय टीका, मोहम्मद शमीचं नाव ओढलं जातंय... कारण

Sangli Shaktipith : आधी इलेक्शन, मग नवे रेखांकन; शक्तिपीठ महामार्गावर सरकारची सावध पावले

Career Growth Astrology: मिथुन राशीसाठी 2026 ठरणार सुवर्णकाळ! गुरुच्या भ्रमणामुळे आयुष्यात लाभ अन् मोठी संधी

SCROLL FOR NEXT