ncp prepare for nagpur municipal corporation election  
नागपूर

राष्ट्रवादी आक्रमक, काँग्रेस मात्र सौम्य; महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी

राजेश चरपे

नागपूर : मोजकेच कार्यकर्ते असणारी राष्ट्रवादी काँग्रेस शहरात अचानक आक्रमक झाली असून तुलनेत काँग्रेस सौम्य झाली आहे. थेट गृहमंत्री अनिल देशमुख आणि ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल दर आठवड्यात भेटीगाठी, सभा- संमेलने घेत असल्याने राष्ट्रवादीमध्ये उत्साह संचारला आहे. महापालिकेच्या निवडणुकीत अधिकाधिक जागा मिळाव्यात यासाठी राष्ट्रवादीची धडपड सुरू असल्याचे बोलले जात आहे. 

महापालिकेतही महाआघाडी कायम राहिल्यास जागा वाटप करताना काँग्रेसतर्फे दुय्यम स्थान मिळू नये याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. यापूर्वी दोन्ही काँग्रेसने एकत्रितच निवडणूक लढल्या आहेत. मात्र, काँग्रेसने पंधराच्यावर जागा दिल्या नाहीत. एवढेच नव्हे तर शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटपाचा तिढा कायम ठेवला. आम्हालाच जागा कमी पडतात असे काँग्रेसचे म्हणणे होते. मागील निवडणूक राष्ट्रवादीने स्वबळावर लढवली. त्यामुळे त्यांचा एकच नगरसेवक शिल्लक राहिला. चार वॉर्ड प्रभागाचाही त्यांना फटका बसला. काँग्रेसचेही यामुळे नुकसान झाले. दीडशे जागा लढवून फक्त २८ नगरसेवक काँग्रेसचे निवडून आले. आता परिस्थिती बदलणार आहे. प्रभागाचा वॉर्ड होणार आहे. राष्ट्रवादीने किमान २० नगरसेवक निवडून येतील याचे नियोजन करणे सुरू केले आहे. त्यासाठी किमान ४० जागा सोडण्याची मागणी करावी लागणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीने आक्रमक धोरण स्वीकारले आहे. अनिल देशमुख आणि प्रफुल पटेल यांच्यावर राष्ट्रवादीच्या विस्ताराची जबाबदारी सोपविली आहे. दर आठवड्यात त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका, भेटीगाठी घेणे सुरू केले आहे. लग्नसमारंभापासून तर स्नेहभोजनालाही दोन्ही नेते हजेरी लावत आहेत. त्यामुळे कार्यकर्ते चार्ज झाले आहेत. थेट बडे नेते आणि निर्णयाचे अधिकार असलेले नेतेच येत असल्याने प्रत्येकजण त्यांच्या पुढ्यात शक्तीप्रदर्शन करून आपल्या नावाची चर्चा घडवून आणत आहे. याशिवाय राष्ट्रवादीने सर्वांसाठी पक्षाची दारे उघडी केली आहेत. 

हेही वाचा - VIDEO : '...तर काँग्रेस अन् राष्ट्रवादीमधील अर्धे नेते तुरुंगात जातील'
 
काँग्रेसचे जर-तर... 
दुसरीकडे काँग्रेस अद्यापही गटबाजीतून बाहेर पडायला तयार नाही. अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष नसल्याने 'आता आपली बारी' असे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या विरोधकांना वाटत आहे. पालकमंत्री नितीन राऊत आणि  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे यावेळी जागा वाटप करताना आपल्याला प्राधान्य दिले जाईल, असेही ठाकरे विरोधकांचा तर्क आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Traffic Challan Recovery: थकबाकी असलेला ट्रॅफिक दंड आता वीज बिलातून वसूल होणार? सर्वोच्च न्यायालयाची सरकारांना महत्त्वाची सूचना

IMD Weather Alert : हवामान खात्याचा मोठा इशारा! 28 राज्यांत जोरदार पावसाची शक्यता; ताशी 60 ते 70 किमी वेगाने वाहणार वारे, महाराष्ट्रात स्थिती काय?

Pune Traffic: अंगारकी संकष्टीत दगडूशेठ गणपती दर्शनासाठी गर्दी; पुणे मध्यवर्ती भागातील वाहतुकीत तात्पुरते बदल

Latest Marathi News Live Update: पुणे जिल्हा दूध संघाकडून शेतकऱ्यांना १ रुपयाचा दूधदर फरक

MPSC Main Exam 2026 Postponed : MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 3 ऑक्टोबरपासून होणाऱ्या तीन महत्त्वाच्या मुख्य परीक्षा ढकलल्या पुढे; आयोग लवकरच जाहीर करणार नव्या तारखा

SCROLL FOR NEXT