Sunil Kedar 
नागपूर

Sunil Kedar: माजी आमदार केदार यांना जंतूसंसर्ग; चार तज्ज्ञांच्या निरीक्षणात उपचार

केदार यांना मायग्रेनचाही त्रास आहे. त्याचप्रमाणे गेल्या शुक्रवारी शिक्षा सुनावल्यानंतर त्यांना छातीत दुखू लागले. यामुळे मेडिकलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.

Sandip Kapde

Sunil Kedar: नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १५० कोटींच्या रोखे गैरव्यवहारात सत्र न्यायालयाने पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावलेले काँग्रेसचे सावनेर येथील माजी आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार यांना मूत्रमार्गात जंतूसंसर्ग झाल्याने त्यांच्या क्रिएटिनिनमध्ये वाढ झाली. त्यामुळे तुर्तास त्यांच्यावर ‘मेडिकल’मधील चार विशेष तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार केले जात आहेत.

केदार यांना मायग्रेनचाही त्रास आहे. त्याचप्रमाणे गेल्या शुक्रवारी शिक्षा सुनावल्यानंतर त्यांना छातीत दुखू लागले. यामुळे मेडिकलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्यानंतर केदार यांचे सिटी स्कॅन आणि एन्जिओग्राफीदेखील करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.

मात्र, मंगळवारी त्यांच्या शरीरातील ‘टीएलसी’चे प्रमाण ३० हजारांपर्यंत वाढले होते. हे प्रमाण सामान्य झाल्यानंतरच त्यांच्या या निदान चाचण्या केल्या जाण्याची शक्यता आहे.

शिक्षेवरील स्थगिती अन्‌ जामिनावर उद्या निकाल-

एनडीसीसी बँक गैरव्यवहारप्रकरणी न्यायालयाच्या निकालाला आव्हान देत सुनील केदार यांच्यासह चार आरोपींनी शिक्षेला स्थगिती आणि जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. परंतु, आरोपींच्या युक्तिवादावर अतिरिक्त लेखी उत्तर दाखल करण्यासाठी राज्य शासनाने १ जानेवारी पर्यंत मुदत वाढवून देण्याची विनंती केली होती. न्यायालयाने सरकारची विनंती फेटाळून लावत उद्या (ता. २८) निकाल देण्याचे निश्‍चित केले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna Crime: शिक्षकच ठरला भक्षक! विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करून अत्याचार; जालन्यात शिक्षक अटकेत, शिक्षणाच्या मंदिरातच घडला संतापजनक प्रकार

Jowar Price Hike : भाकरी महागली... ज्वारी 50 पार; बार्शीच्या शाळू ज्वारीने गाठला प्रतिकिलो 80 रुपयांचा दर

दोन सहकारी अन् मित्राच्या त्रासाला कंटाळून TCS मधील आयटी अभियंत्यानं संपवलं जीवन, चिठ्ठीत गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : माजलगावात पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला; मारहाणीची घटना CCTV मध्ये कैद

Mumbai Local: सीटच्या वादातून रक्तरंजित हल्ला; प्रवाशाच्या पोटात चाकू खुपसला, मुंबई लोकलमध्ये काय घडलं?

SCROLL FOR NEXT