file photo 
नागपूर

हे काय? आधी निगेटिव्ह, मृत्यूनंतर पॉझिटिव्ह...

पुरुषोत्तम डोरले

मौदा (नागपूर) : नागपूर जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मृतांचा आकडाही वाढतच चालला आहे. मात्र, असे असताना नागरिक मनावर घेत नसल्याचे दिसून येत आहे. आता कोरोना गावखेड्याही पसरला आहे. कोरोनाच्या चाचण्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे रुग्णांची संख्याही वाढत आहे. मौदा तालुक्यातील एका व्यक्तीची घेतलेली चाचणी प्रश्न उपस्थित करणारी आहे. काय झाले नेमके वाचा...

मौदा तालुक्यात कोरोना बळीचा आकडा तीनवर पोहोचला आहे. शुक्रवारी (ता. २१) खात ३, निमखेडा १, खरडा २, मौदा २ व बेरडेपार १ (मृत्यूनंतर) अशा ९ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तालुक्यात बाधितांच्या संख्येत होणारी वाढ चिंता वाढविणारी आहे. तालुक्यातील बेरडेपार येथील ४७ वर्षीय व्यक्तीचा अहवाल मृत्यूनंतर पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कोरोना चाचणीवर संशय बळावला असून तर्कवितर्क लावले जात आहेत. 

बेरडेपार येथील व्यक्तीची दोनदा रॅपिड अँटिजेन चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली. परंतु, बुधवारला प्रकृती बिघडल्यामुळे नागपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर लता मंगेशकर रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर शासकीय रुग्णालयात कोरोना चाचणी करण्यात आली. चाचणी पॉझिटिव्ह निघाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 

विश्वास कोणत्या चाचणीवर? 
रॅपिड अँटिजेन चाचणीत पॉझिटिव्ह निघाल्यानंतर आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह येत आहे, असे एकंदरीत निदर्शनास येत आहे. परंतु, रॅपिड अँटिजेन चाचणी निगेटिव्ह असतानाही रुग्णाच्या मृत्यूनंतर पॉझिटिव्ह चाचणी येत आहे. विश्वास कोणत्या चाचणीवर करावा, असा संभ्रम नागरिकांना पडला आहे. 

(संपादन : मेघराज मेश्राम) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Result 2026 : तब्बल तीन तासांच्या राजकीय गोंधळानंतर गोकुळचा निकाल जाहीर, सतेज पाटील गोकुळचे किंगमेकर

CJP च्या नेत्यांच्या अडचणीत वाढ; जंतरमंतर आंदोलन प्रकरणी आशुतोष रांका आणि सौरव दास यांना न्यायालयीन धक्का!

Tiger Shroff Firing Case : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील आरोपींना पकडणाऱ्या कोण आहेत आयपीएस तेजस्विनी गौतम?

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Daler Mehndi: 'मद्य पिऊन गाऊ नका..!' उत्तराखंडच्या मंत्र्यांनी दलेर मेहंदी यांना मंचावरच विचारला जाब

SCROLL FOR NEXT