विविध भूमिका वठविणारी नेहा ठोंबरे
विविध भूमिका वठविणारी नेहा ठोंबरे विविध भूमिका वठविणारी नेहा ठोंबरे
नागपूर

स्वरस्वतीच्या रूपातून कलेची उपासना; वैदर्भीय भाषेतून मनोरंजन

केतन पळसकर

नागपूर : सरस्वतीला विद्येसह साहित्य, संगीत, कला याचीसुद्धा देवता मानले जाते. प्रेक्षकांची करमणूक करीत कलावंतांच्या रूपाने सरस्वती देवता दर्शन देत असते. यापैकी एक म्हणजे अस्सल वैदर्भीय बोलीसह मनोरंजन करणारी नेहा ठोंबरे. नवरात्री निमित्त ‘एंटरटेनमेंट’ क्षेत्रातील वैदर्भीय आदिशक्तीचा जाणून घेतलेला हा प्रवास.

नेहा ठोंबरे ही विटाळा (ता. धामणगाव, जि. अमरावती) येथील शेतकरी कुटुंबातील मुलगी. वडील शेतकरी तर आई नुकतीच गावची झालेली सरपंच. त्यामुळे अभिनय क्षेत्राचा आणि नेहाचा दूरदूरपर्यंत कुठलाही संबंध नाही. मात्र, शालेय जीवनामध्ये आंतरशालेय नाट्य स्पर्धेसाठी शिक्षकांनी बसविलेल्या नाटीकेमध्ये नेहाला काम करण्याची संधी मिळाली आणि पहिल्याच नाटकामध्ये तिने अभिनयाचे प्रथम पारितोषिक प्राप्त केले. इथूनच तिच्यातील या रूपाची चुणूक दिसायला लागली.

मात्र, शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नेहा अभिनयापासून काहीशी दूर होती. दहावीमध्ये शाळेत पहिला क्रमांक, बारावी फर्स्ट क्लासमध्ये ती पास झाली. त्यानंतर पुणे येथून अभियांत्रिकी विषयामध्ये पदवी आणि मुंबई येथून पदविकासुद्धा फर्स्ट क्लासमध्ये तीने उत्तीर्ण केली. कलेसह विद्यासंपन्नतेमुळे विद्येची देवता सरस्वती तीच्या रूपाने अवतरली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

मुंबईत शिक्षण घेण्याची संधी मिळाल्यानंतर अभिनयाचे कीडे तीला काही स्वस्थ बसू देईनात. मुंबईला शिक्षण सुरू असतानाच तिची गाठ काही नाटक वेड्यांशी पडली. एप्रिल २०१८ साली प्रसिद्ध डिजिटल प्लॅटफॉर्म ‘भाडिपा’ने तीला स्टँडअप्‌ कॉमेडीसाठी संधी दिली आणि तीचा या जगातील प्रवासाची सुरुवात झाली. फक्त विनोदी व्हिडिओ ती तयार करीत नसून यातून विदर्भातील जनतेला एक सकारात्मक संदेश देण्याचा ही सरस्वती रुपी नेहा प्रयत्न करते आहे.

काही प्रसिद्ध युट्यूब व्हिडिओ

  • लॉकडाऊन, लग्नस्थळ आणि आई

  • असा जावई नको व माय

  • विदर्भातील आई आणि लॉकडाऊन

  • ऑनलाइन वेडिंग

  • विदर्भातील आई, रेडिओ आणि दिवाळी

  • इंडियन मॉम ऑन पबजी बॅन

...त्या घटनेमुळे बदलले आयुष्य

वऱ्हाडी बोलीसह हसविण्यात नेहा गर्क असताना अचानक २०१८ साली आयुष्यात अप्रिय घटना घडली. तिच्या लहान भावाचे निधन झाल्याने एकंदर जग बदलले. कठीण समई आई-वडिलांना आधार मिळावा म्हणून मुंबई सोडून तिने घरापासून जवळ असलेले नागपूर शहर नोकरीसाठी निवडले. सध्या ती नागपुरातील नॅशनल लॉ युनीव्हर्सिटीमध्ये अधीक्षक पदावर सेवा बजावीत आहे. लॉकडाऊन दरम्यान घरी बसून काय करावे म्हणून तिने ‘नेहागिरी’ हे युट्यूब चॅनल बनविले आणि बघता बघता अस्सल वऱ्हाडी भाषेला विनोदाचा टच देत सातासमुद्रापार पोहोचविले.

विदर्भ अनेक गोष्टींमध्ये मागासलेला म्हणून इतर प्रदेशात ओळखला जातो. विदर्भाची ही ओळख मला पुसायची आहे. यासाठी मी ‘#आपला विदर्भ आपली जवाबदारी’ ही मोहीम सुरू केली आहे. विनोदासह समाजाला सकारात्मक संदेश मिळावा म्हणून वैदर्भीय भाषेतून केलेला हा माझा छोटासा प्रयत्न आहे.
- नेहा ठोंबरे, स्टँडअप कॉमेडियन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात 50.71 टक्के मतदान; महाराष्ट्र अजूनही सगळ्यात मागे

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

Kushal Badrike : "... ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर निघून जातात"; कुशलने व्यक्त केली खंत

Summer Home Decor Tips: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा करुन घ्या फायदा; 'अशा' पद्धतीने करा घराचा मेकओव्हर.. सर्वजण पाहतच राहतील

SCROLL FOR NEXT