Subhashchandra Bose sakal
नागपूर

नेताजींनी केली होती नागपुरात ‘फॉरवर्ड ब्लॉक’ची घोषणा

रामभाऊ रुईकरांकडे मध्य प्रांताची जबाबदारी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नागपुरात फार येणे झाले नसले तरी नागपूरशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. देशातील कामगार चळवळीचे प्रवर्तक कामगार केसरी रामभाऊ रुईकर हे नेताजींचे अतिशय जवळचे व विश्वासू सहकारी होते. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना करण्यासंदर्भातील घोषणा नेताजी यांनी नागपुरात केली होती. त्याचवेळी तत्कालीन मध्य प्रांताच्या अध्यक्षपदाची जबाबदारी रामभाऊ रुईकर यांच्याकडे दिली होती. नेताजी काँग्रेसचेच नेते असले तरी १९३८ साली त्यांचे पक्षातील काही नेत्यांशी मतभेद झाले. यामुळेच त्यांनी १९३९ मध्ये ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली.

पक्ष स्थापनेनंतर ते पहिल्यांदा नागपूरला आले. त्यावेळी रामभाई रुईकर आपल्या सहकाऱ्यांसह त्यांच्या स्वागतासाठी रेल्वेस्थानकावर गेले होते. त्यानंतर रेल्वेस्थानकापासून तर सभास्थळ असलेल्या चिटणीस पार्कपर्यंत सुभाषबाबूंची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. नागपूरकरांच्या या प्रेमाने सुभाषबाबू भारावून गेले. स्वामी सहजानंद सरस्वतींसारखे अनेक मोठे नेते यावेळी हजर होते. कॉटन मार्केटला लागून असलेल्या ज्या मार्गाने ही मिरवणूक गेली तो मार्ग अजूनही सुभाष मार्ग म्हणून ओळखला जातो.

विशेष म्हणजे ‘कामगार केसरी’ रामभाऊ रुईकर यांच्यामुळे जुन्या मध्यप्रातांत नेताजींचा विचारांचा प्रसार झाला. त्यातूनच स्वातंत्र्यानंतर कॉटन मार्केट चौकातच जांबुवंतराव धोटे यांनी सुभाषबाबूंचा पुतळा उभारण्याचे ठरविले होते. मात्र, त्याचवेळी उमेशबाबू चौबे यांच्या पुढाकाराने या चौकात युद्धातील शहिदांचे स्मारक उभारण्यात आले. त्यामुळे पुढे नेताजींचा पुतळा मानस चौकात उभारण्यात आला.

रुईकरांनी केला होता नेताजींचा पराभव

स्वातंत्र्यापूर्वी १९२६ साली इंग्रजांनी कामगार संघटना तयार करण्यास परवानगी दिली. त्यानंतर देशात ‘ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेस’ची स्थापना करण्यात आली. यामध्ये कॉंग्रेसी, समाजवादी आणि सोशलिस्ट विचाराचे नेते सहभागी होते. या संघटनेच्या अध्यक्षपदासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी उमेदवारी अर्ज दाखल कला होता. नागपुरातून कामगार नेते रामभाऊ रुईकर यांनी उमेदवारी दाखल करीत, त्यावेळी नेताजींचा पराभव केला होता अशी माहिती डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. विशेष म्हणजे, त्यानंतर कामगार नेते रामभाऊ रुईकर आणि नेताजींमध्ये मैत्रिचे संबंध अधिक दृढ झाले. याशिवाय ते नागपूरला आल्यावर रामभाऊ रुईकर यांच्याच घरी थांबायचे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संविधानात बसेल ते मिळेल, कुणाच्या ताटातलं देणार नाही; मराठा आरक्षणावर फडणवीसांची प्रतिक्रिया, जरांगे म्हणाले, ताटच उरणार नाही

सभ्य रहा, नीट कपडे परिधान करा! भाडेकरू मुलींना घरमालकाचा सल्ला, रूममध्ये लावला CCTV कॅमेरा

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Sainik Takli MIDC protest : सैनिक टाकळी एमआयडीसीविरोधात शिरोळमध्ये राडा; प्रशासनाच्या कार्यालयाचे गेट तोडले, काचा फोडल्या, पोलिस कर्मचारी जखमी

Duleep Trophy 2026: हा, मुलगा कमाल आहे! वैभव सूर्यवंशीच्या सांगण्यावरून DRS घेतला अन् सामन्यात ट्विस्ट आला Video Viral

SCROLL FOR NEXT