new rules for PET exam in nagpur university 
नागपूर

पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी नवे नियम, पात्रता परीक्षा न झाल्याने विद्यार्थी चिंतेत

मंगेश गोमासे

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी नवीन नियम लागू केले आहेत. यासंदर्भात विद्यापीठाने अधिसूचना काढली आहे. त्यानुसार पीएच.डी. प्रवेश परीक्षा (पेट) फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या सुरुवातीस घेण्यात येईल, असे सांगण्यात येत होते. मात्र, हा कालावधी निघून गेला असल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

विद्यापीठ अनुदान आयोगाने २००९ साली काढलेल्या दिशानिर्देशावरुन विद्यापीठात २०१५ साली पीएच.डी.मध्ये मोठे फेरबदल करण्यात आले. त्यानुसार पीएच.डी. प्रवेशासाठी 'पेट' परीक्षेस सुरुवात करण्यात आली. यानंतर दोन वर्षापूर्वी विषयनिहाय 'पेट-२' ही परीक्षाही लागू करण्यात आली. मात्र, पेट-१ परीक्षेच्या स्वरुपामुळे ती उत्तीर्ण करणाऱ्या मानव्यशास्त्राच्या उमेदवारांची संख्या बरीच रोडावली. त्यामुळे विधिसभेचे ज्येष्ठ सदस्य डॉ. आर.जी. भोयर व डॉ. पेशवे यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली होती. या समितीने पीएच.डी.च्या जाचक अटींमध्ये बदल करीत नवा शिफारशीचा समावेश केला होता. त्यानुसार गेल्यावर्षी मार्चमध्ये झालेल्या बैठकीत हा अहवाल चर्चेसाठी ठेवण्यात आला होता. त्यात डॉ. भोयर यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिशानिर्देशाचा अभ्यास करून बदल करण्यात आल्याचे स्पष्ट केले. अहवालात ३२ शिफारशींचा समावेश होता. दरम्यान, त्यासंदर्भात नवी समिती तयार करून दोन्ही समितीच्या शिफारशीचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार या शिफारशी मान्य करीत विद्यापीठाने ३ फेब्रुवारीला अधिसूचना काढली. त्यामुळे लवकरात लवकर नव्या नियमांसह पीएच.डी. प्रवेशासाठी पात्रता परीक्षा (पेट) घेणे अनिवार्य होते. मात्र, मार्च महिना सुरू होऊन दहा दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला असून अद्यापही वेळापत्रक देण्यात आलेले नाही. 

अशी असेल नवी 'पेट' परीक्षा -
आत्तापर्यंत नागपूर विद्यापीठात 'पेट -१' आणि 'पेट -२' या दोन प्रवेश परीक्षा घेण्यात यायच्या. मात्र, आता विद्यापीठाने 'पेट-२' परीक्षा रद्द केली आहे. 'पेट-१' च्या स्वरूपात बदल करून त्याच्या पहिल्या टप्प्यात रिसर्च मेथडॉलॉजी आणि दुसरा टप्प्यात विषयाचे ज्ञान यावर प्रश्न विचारले जातील. हे संपूर्ण ५० प्रश्न बहुवैकल्पीक असून विश्लेषणात्मक राहणार नाहीत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT