नागपूर

माता नव्हे तू वैरीणी; बाळावर पुलावरून फेकून काढला पळ

अनिल कांबळे

नागपूर : प्रेमसंबंध किंवा अनैतिक संबंधातून राहिलेल्या गर्भामुळे जन्मास आलेल्या बाळाची लपवणूक करण्यासाठी निष्ठुर मातेने जन्म होताच बाळाला नाल्यात फेकून पळ काढला. त्यामुळे त्या बाळाचा मृत्यू झाला असावा. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास वाठोड्यात उघडकीस आली. या प्रकरणी बाळाला सोडून पलायन करणाऱ्या आईविरुद्ध वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नवजात शिशूचा जन्म लपविण्यासाठी निर्दयी मातेने पंतप्रधान आवास योजनेसमोर असलेल्या नाल्यात शिशूला फेकले. या नाल्याच्या शेजारी शुभांगी देशमुख या महिलेची चहा टपरी व पानठेला आहे. सोमवारी सायंकाळी शुभांगी नाल्याच्या काठावर लघुशंकेसाठी गेली असता नाल्यातील पाण्यात काहीतरी गुंडाळलेले दिसले. उत्सुकतेपोटी त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता नवजात अर्भक मृतावस्थेत असल्याचे दिसले.

त्यांनी पोलिसांना फोन करून घटनेबाबत माहिती दिली. वाठोडा ठाण्याचे पथक घटनास्थळावर पोहोचले व मृत अर्भकाला ताब्यात घेतले. यानंतर उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात मातेविरुद्ध गुन्हा दाखल करून शोध घेणे सुरू केला आहे. याप्रकरणी वाठोडा पोलिसांनी निर्दयी मातेवर गुन्हा दाखल केला आहे.

अशीही चर्चा

वाठोडा परिसरातील युवतीला अनैतिक संबंधातून गर्भधारणा झाली होती. अपत्याचा जन्म झाल्याबरोबरच युवतीच्या नातेवाइकांनी बाळाला पुलावरून नाल्यात फेकून पळ काढला, अशी कुजबुज परिसरातील नागरिकात सुरू होती. पुढील तपास पोलिस करीत आहेत. या रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिस तपासत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patekar Death: ८ दिवसांपूर्वीच भेट झाली, तेव्हा...; तुकाराम मुंढेंनी सांगितला नाना पाटेकर यांचा 'तो' किस्सा

ज्ञानेशकुमारांच्या राजीन्यासाठी राहुल गांधी रस्त्यावर का? 300 खासदारांचा मोर्चा

Property Rights: कन्यादान केलं म्हणून मुलीचा मालमत्तेवरील हक्क संपतो? वडिलांच्या संपत्तीत मुलीचा हक्क काय?

Latest Marathi News Live Update : एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सरकारचे प्रतिनिधी आज संवाद साधण्याची शक्यता

NANA PATEKAR: सेटवर नाना पाटेकरांच्या पोटात घुसला होता खरा चाकू; तरीही थांबवला नाही शूटिंगचा सीन, काय आहे किस्सा?

SCROLL FOR NEXT