Murder
Murder Sakal
नागपूर

Nikhil Meshram Murder: निखील मेश्राम हत्याप्रकरणी ७ जणांना जन्मठेप; 5 निर्दोष

सकाळ डिजिटल टीम

नागपूर येथील निखील मेश्राम हत्याकांड प्रकरणी पाच आरोपींची निर्दोष मुक्तता झाली तर ७ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २०१८ मध्ये प्रेमप्रकरणातून निखिलची हत्या झाली होती. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. (Nikhil Meshram Murder Case Life imprisonment for seven people five people freee)

प्रेम प्रकरणात उद्भवलेल्या वादातून प्रियकराच्या भावाची हत्या केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायालयानं हा महत्वाचा निर्णय दिला आहे. यामध्ये सात जणांना दोषी ठरवीत जन्मठेप, प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड अन्‌ दंड न भरल्यास एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तर पाच आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली. या सातही आरोपींवर मुलीच्या प्रियकराचा भाऊ निखिल दिगांबर मेश्राम याची हत्या केल्या प्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. कावरापेठेतील रामसुमेरबाबानगर येथील रहिवासी शंकर नथ्युलाल सोलंकी (वय ४२), देवीलाल ऊर्फ देवा नथ्युलाल सोलंकी (वय २८), सुरज चेतन राठोड (वय २०), रमेश नथ्युलाल सोलंकी (वय ३६), यश ऊर्फ गुड्डू हरीश लाखानी (वय १९), मिख्खन नथ्युलाल सालाद (वय १९), मीना नथ्युलाल सालाद (वय ३५) याचा समावेश आहे, यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

काय घडलं होतं नेमकं?

याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. गावंडे यांनी निर्णय दिला. ही घटना २० मे २०१८ रोजी शांतीनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली होती. किरण ऊर्फ विक्की मेश्राम यांचे आरोपीच्या कुटुंबातील मुलीसोबत प्रेमसंबंध होते. याचा आरोपींच्या कुटुंबीयांमध्ये राग होता. याच वादातून घटनेच्या एक दिवस आधी (१९ मे २०१८) किरण मेश्रामसह त्यांच्या आईला आरोपींनी मारहाण करून जखमी केले. किरणने दिलेल्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही तक्रार मागे घेण्यासाठी आरोपींनी किरण आणि निखिल मेश्राम यांच्यावर दबाव टाकला होता. मात्र, त्यांनी तक्रार मागे घेण्यासाठी नकार दिला. याचाच राग मनात धरून २० मे २०१८ रोजी किरण व निखिल घरासमोर बसले असता आरोपी तिथे आले. त्यांनी किरण व निखिलच्या डोळ्यात मिरची पावडर टाकले. तसेच लाठ्या, विटा, दगड, लोखंडी रॉड, कुऱ्हाडीने हल्ला करून दोघांनाही जखमी केले. यात निखिलच्या डोक्याला जबर मार बसला. त्याला मेयो रुग्णालयात भरती केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

पाच आरोपी गंभीर व किरकोळ जखमी झाले. तक्रारदाराने २४ आरोपींविरुद्ध शांतीनगर पोलिसांत तक्रार दाखल केली. अतिरिक्त सत्र न्यायालयाने या प्रकरणात १७ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. त्यानुसार, ७ आरोपींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली. पाच आरोपींची मुक्तता केली. राज्य शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील प्रशांत साखरे यांनी बाजू मांडली.

चार महिला आरोपी फरार

घटनेतील २४ आरोपींमध्ये आठ विधीसंघर्ष बालकांचा समावेश होता. यातील १२ आरोपींना अटक करण्यात आली व त्यांच्यावर खटला चालविण्यात आला. यात गीता राठोड, माया सोलंकी, राजुरी परमार, धनश्री सोलंकी या चार महिला आरोपींचा समावेश होता. विशेष म्हणजे, या चारही महिला साडेचार वर्षांपासून फरार आहेत.

एकावेळी सात जणांना जन्मठेपेची पहिलीच घटना

या प्रकरणात एका महिलेसह १२ आरोपींवर खटला चालविण्यात आला. यातील सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. एकावेळी सात आरोपींना जन्मठेप सुनावण्यात आल्याची ही अलीकडच्या काळातील पहिलीच घटना आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Soan Papdi: बाबा रामदेव यांना आणखी एक धक्का! पतंजलीची सोनपापडी निकृष्ट, तिघांना तुरुंगवास

Rohit Sharma : 'रोहित शर्मा फॉर्मात येणे भारतीय संघासाठी...' भारताच्या दिग्गज खेळाडूचे मोठं वक्तव्य

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

SCROLL FOR NEXT