Ninety Eighty dengue patients were found during the year 
नागपूर

वर्षभरात आढळले डेंगीचे ९८ रुग्ण; एकाचा मृत्यू, पुढील उपाययोजना करा

राजेश प्रायकर

नागपूर : शहरात कोरोनाने थैमान घातले असले तरी महापालिकेने डेंगी तसेच मलेरियाबाबतही तपासणी सुरू ठेवली होती. गेल्या वर्षभरात शहरात ९८ डेंगीच्या रुग्णांची नोंद करण्यात आली. याशिवाय मलेरियाचेही पाच रुग्ण आढळून आले.

महापालिकेच्या मलेरिया, फायलेरिया विभागाकडून जानेवारी ते सात डिसेंबरपर्यंत शहरातील ६२६ जणांची तपासणी करण्यात आली. यापैकी ९८ जणांना डेंगी झाल्याचे आढळून आले. जून महिन्यात सतरंजीपुरा झोनमधील प्रभाग २१ मधील प्रेमनगरात एका रुग्णाचा मृत्यू झाला. डेंगीचे सर्वाधिक १८ रुग्ण सप्टेंबर महिन्यात आढळले. ऑगस्ट, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात प्रत्येकी १६ रुग्णांची नोंद झाली.

जुलैमध्ये १०, जानेवारीमध्ये ८, जून ७, फेब्रुवारी ४, मे महिन्यात २ रुग्ण आढळून आले. एप्रिल आणि डिसेंबरमध्ये एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. मलेरियाचे जून व जुलैमध्ये ४ आणि ऑक्टोबरमध्ये १ असे एकूण ५ रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती मलेरिया व फायलेरिया अधिकारी दिपाली नासरे यांनी दिली.

जानेवारी ते सात डिसेंबर या कालावधीमध्ये मनपाने एक लाख ३३ हजार २१७ जणांची चाचणी केली. यापैकी पाच रुग्णांचा अहवाल मलेरिया पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती नासरे यांनी दिली.

शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत शहरातील रुग्णांची संख्या कमी असली तरी नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. घरी अथवा परिसरात स्वच्छता राखली जावी याबाबात प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

काय करावे 

  • डासांची पैदास केंद्र बंद करणे 
  • घाण होणार नाही याची दक्षता 
  • कचऱ्याची विल्हेवाट लावावी

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohammed Shami: ३ सामन्यात १५ विकेट्स... शमीचा परफॉर्मन्स जबर, तरी संघाबाहेर! आगरकर-गंभीर वादामुळे ‘क्लीन बोल्ड’?

Indurikar Maharaj daughter engagement : निवृत्ती महाराज इंदुरीकरांकडून लेकीच्या साखरपुड्यात लाखोंचा खर्च? ; डबेवाला संघटना अध्यक्षांची जोरदार टीका, म्हणाले...

Sand Mafia Caught : महसूल विभागाचा वाळू माफीयांना दणका : संयुक्त कारवाईत अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन बोटी उडवल्या!

'लागली पैज?' नाटक येतंय प्रेक्षकांच्या भेटीला; 'शुभविवाह' फेम अभिनेता साकारतोय मुख्य भूमिका; रुमानी खरेचं रंगभूमीवर पदार्पण

Baramati Nagar Parishad Election : बारामतीत जय पवार यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याची मागणी......

SCROLL FOR NEXT