Ninth, Eleventh class will be re-examined 
नागपूर

मोठी बातमी : नववी, अकरावीची होणार फेरपरीक्षा 

मंगेश गोमासे

नागपूर : राज्यातील शाळांमध्ये नववी आणि अकरावीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा होईल काय? याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, शालेय शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेत, त्यांना पुढच्या वर्गात पाठविण्याबाबतचा अध्यादेश पाठविला आहे. 

कोरोनामुळे यंदा राज्यात पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षा घेता येणे शक्‍य झाले नाही. त्यामुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठविण्याचे आदेश सरकारने काढले. मात्र, कोरोनामुळे नववी आणि अकरावीचीही परीक्षा घेता येणे शक्‍य झाले नाही. त्यामुळे प्रथम सत्राची सरासरी आणि वर्षभराचा आढावा यानुसार नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना समोरच्या वर्गात प्रवेश देण्यात आला. 

मात्र, प्रथम सत्रात अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी यामध्येही अनुत्तीर्ण झाल्याने त्यांना समोरच्या वर्गात जाता येणे शक्‍य नसल्याचे दिसून आले. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे फेरपरीक्षा घेण्याचे आदेश यावर्षी आले नसल्याने शिक्षक चिंतेत सापडले होते. यातूनच आज सायंकाळी शालेय शिक्षण विभागाने निर्णय घेत, नववी आणि अकरावीच्या फेरपरीक्षांना मान्यता दिली. आता शाळांमध्ये विद्यार्थ्याला प्रत्यक्ष बोलावून किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून तोंडी परीक्षा घेत, या विद्यार्थ्यांना समोरच्या वर्गात प्रवेश देण्यात यावा, असे आदेश दिले आहे. 
 

कशी होणार परीक्षा? 


राज्यात कोरोनामुळे यावर्षी दुसरे सत्र झालेच नाही. सध्या परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून कसे काय तोंडी परीक्षा घ्यायची, हा प्रश्‍न आहे. दुसरीकडे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सोय बऱ्यांच शाळेत नसल्याने त्यातूनही ते करता येणे शक्‍य नसल्याचे दिसून येत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी शिक्षक संघाचे प्रदेश उपाध्यक्ष पुरुषोत्तम पंचभाई यांनी दिली. 


अकरा हजारावर विद्यार्थ्यांची नोंदणी 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे पदवी प्रवेशासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. मात्र, दोनच दिवसात अकरा हजारावर विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर नोंदणी केली असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे याबाबत सिनेट सदस्यांसह संघटनांनी विरोध दर्शविला आहे.  विद्यापीठाने यावर्षी पदवी प्रवेशासाठी प्रथमच संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करीत, दहावी आणि बारावीची गुणपत्रिका अपलोड करण्याचे अनिवार्य केले. या विरोधात प्राचार्य फोरम यांचेसह प्राधीकरण सदस्यांनी विरोध दर्शविला. तसेच, पदव्युत्तर प्रवेशामध्ये ऑनलाइन प्रवेश केल्याने महाविद्यालयांना फटका बसल्याची बाब समोर केली. कोरोना काळात टाळेबंदी असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा फटका बसेल असेही सांगण्यात आले आहे. 
संपादित : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"ट्रम्पला ठार मारणे हे आपले कर्तव्य!" ; इराणमध्ये खामेनींच्या अंत्यविधीवेळी चिथावणीखोर घोषणाबाजी, मोठ्या प्रमाणात गर्दी

Nitesh Rane Non Bailable Warrant : नितेश राणेंना गोवा पोलिस अटक करणार? अजामीनपात्र वॉरंट; टोलनाका तोडफोड प्रकरणात न्यायालयाची कारवाई

Marathi Live Updates : पाताळगंगा नदीच्या पुरात एसटी बस अडकली; आठ प्रवाशांची सुखरूप सुटका

Ramdas Athawale: ठाकरेंनी रामरक्षा नव्हे तर ‘शिवसेना रक्षा’ आंदोलन करावे; मंत्री आठवलेंचा टोला

Chhatrapati Sambhinagar: जिल्हा मध्यवर्ती बँकेत महायुतीची सरशी; कॉंग्रेसचे एकमेव खा. डॉ. कल्याण काळे यांचा ४८ मतांनी विजय

SCROLL FOR NEXT