Gadkari 
नागपूर

Mumbai Goa Highway: "मुंबई-गोवा महामार्ग रखडण्यास मीच जबाबदार"; गडकरींनी कबुली देताना सांगितल्या अडचणी

मुंबई-गोवा महामार्गाचं काम अनेक वर्षांपासून धीम्या गतीनं सुरुच आहे, ते कधी पूर्ण होणार असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नागपूर : मुंबई-गोवा महामार्गाचं काम अनेक वर्षांपासून धीम्या गतीनं सुरुच आहे, ते कधी पूर्ण होणार असे प्रश्न विचारले जात आहेत. यावर केंद्रीय रस्ते, वाहतूक व माहामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

मुंबई-गोवा महामार्ग रखडल्याला मीच जबाबदार आहे, अशी कबुली देताना या कामात किती अडचणी आल्या याची माहिती त्यांनी दिली. सकाळ माध्यम समुहाकडून आयोजित कॉफीटेबल बुकच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.

प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी त्यांची मुलाखत घेतली. (nitin gadkari live updates prashant damle interview nagpur sakal coffee table event mumbai goa highway)

महाराष्ट्राच्या दृष्टीनं नाजूक विषय

प्रशांत दामले गडकरींना प्रश्न विचारताना म्हणाले की, "तुमच्याबाबतीत म्हटलं जातं की, एखादं काम होणार असेल होणार आणि होणार नसेल तर होणार नाही. तुम्ही एकदा ठरवलं की हे करायचं तर करणार नाहीतर नाही होणार विषय संपला. पण महाराष्ट्राच्या दृष्टीनं नाजूक प्रश्न असा आहे की, २०१४ पासून २०२३पर्यंत मुंबई गोवा महामार्ग का झाला नाही?" (Latest Marathi News)

महामार्ग रखडला याला मीच जबाबदार

यावर उत्तर देताना गडकरी म्हणाले, "पहिली गोष्ट तर महामार्ग झाला नाही तर त्याला मीच जबाबदार आहे. याची जबाबदारी मी दुसऱ्यावर ढकलंत नाही. कोकणतील नदीवरील पूल वाहून गेला, त्यानंतर तो आम्ही आठ-नऊ महिन्यात पूर्ण केला. खरं म्हणजे हा महामार्ग जर आधीच पूर्ण झाला असता तर हे लोकही मृत्यू पावले नसते. (Marathi Tajya Batmya)

महामार्ग कधी होणार पूर्ण?

पहिल्यांदा हा महामार्ग हा महाराष्ट्र सरकारकडं दिला होता. त्यावेळी छगन भुजबळ मंत्री असताना त्यांनी टेंडर काढून याची कामं दिली. त्यातले कॉन्ट्रॅक्टर बदलले, पुरेशा अडचणी आल्या. जागा अधिग्रहणाला अजूनही अडचणी येत आहेत. पण ज्या काही अडचणी आणि समस्या आल्या असतील त्याला मी कोणालाही जबाबदार धरत नाही.

या रस्त्यासाठी मी माझ्या आयुष्यात सर्वाधिक बैठका घेतल्या. जवळपास ७५ ते ८० बैठका झाल्या असतील तरीही मला यश मिळालं नाही. पण याचं वर्षी डिसेंबर महिन्याच्या आत हा मुंबई-गोवा रस्ता पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT