Nitin Gadkari said Dont bother officials who do a good job 
नागपूर

चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्रास देऊ नका; गडकरींनी टोचले लोकप्रतिनिधींचे कान

राजेश प्रायकर

नागपूर : शहरात विविध विकासकामे सुरू आहे. उड्डाणपुलांचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असून, काही अडचणी येतात. पण अधिकारी उत्तम काम करीत आहेत. चांगले काम अधिकाऱ्यांना त्रास देऊ नका, अशा शब्दात केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी स्वपक्षातील लोकप्रतिनिधींचे कान टोचले. काही महिन्यांपूर्वी पूर्व नागपुरातील नगरसेवक व माजी स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा प्रयत्न केला होता.

नागपूर-हैदराबाद मार्गावरील चिचभवन येथील अत्याधुनिक रेल्वे ओव्हर ब्रिजचा लोकार्पण सोहळा वर्धा मार्गावरील साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशनच्या सभागृहात पार पडला. केंद्रीयमंत्री गडकरी यांनी ऑनलाइन पद्धतीने कळ दाबून लोकार्पण केले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषा धावडे, खासदार डॉ. विकास महात्मे, ज्येष्ठ नेते दत्ता मेघे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार समीर मेघे यांच्यासह इतर आमदार, नगरसेवक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी उपस्थित होते.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख ऑनलाइन पद्धतीने या सोहळ्यात उपस्थित झाले. विविध ठिकाणी आरओबी तयार करून रेल्वे फाटकमुक्त शहर करण्यात आले आहे. परंतु वर्धा मार्गासह विविध ८१ आरओबी रेल्वेच्या आडमुठ्या धोरणामुळे अडकले आहेत. त्यासाठी एक समिती तयार केली आहे. बुटीबोरी ते जाम रस्त्यावरील आरोपी गेल्या १६ वर्षांपासून रखडला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कामे करताना अनेक अडचणी येतात. परंतु अधिकारी प्रामाणिकपणे काम करीत आहेत.

चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्रास देऊ नका, असे त्यांनी यावेळी लोकप्रतिनिधींना सांगितले. पुढील वर्षभरात ५० विकास कामांचे उद्‍घाटन करण्यात येईल, असे नमुद करीत त्यांनी महापालिका निवडणुकीसाठी भाजप तयार असल्याचे संकेत दिले. पुढील काही काळात पूर्व नागपुरात ७ तर उत्तर नागपुरात ३ विकास कामांचे भूमीपूजन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी शहरातील विविध प्रकल्पाचा पुनरुच्चार केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या बदलत्या चेहऱ्यासाठी गडकरी यांची स्तुती केली.

काटोल-नागपूर रस्त्यात वन विभागाचा अडथळा

यावेळी ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रमात सहभागी झालेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काटोल-नागपूर चारपदरी रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची विनंती केली. केंद्रीयमंत्री गडकरी यांनी यावेळी या रस्त्यामध्ये वन विभागाचा अडथळा असून त्यांच्याकडे मंजुरीची फाइल असल्याचे सांगितले. वन विभागाकडून मंजुरी घ्या, काटोल येथेच या रस्त्याचे भूमीपूजन करू, असे आश्वासन गडकरी यांनी गृहमंत्री देशमुख यांना दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune land scam: बोपोडी जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठी अपडेट; तहसीलदारांचा जामीन फेटाळला, कोर्टात नेमकं काय घडलं?

Viral Video: धावत्या रिक्षात कपलचा सुरु होता रोमान्स, लाईव्ह व्हिडिओ व्हायरल झाला अन्...

Pune Municipal Election : भाजपविरोधात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; पुणे महापालिका निवडणुकीत संयुक्त रणनितीची शक्यता!

टी२० वर्ल्ड कपसाठी Shubham Gill ची जागा घेतली आता IPL फ्रँचायझी काढणार वचपा? 'त्या' Video नंतर चर्चा

Latest Marathi News Live Update : जमिनीचा बेकायदा ताबा घेत खंडणी उकळल्याप्रकरणी बंडू आंदेकरला अटक

SCROLL FOR NEXT