NIV Reports of England return man still awaited in Nagpur  
नागपूर

तब्बल १० दिवस उलटूनही इंग्लंड रिटर्न कोरोनाबाधिताचा एनआयव्हीकडून अहवाल नाही; ८ जण पेइंगमध्ये दाखल 

केवल जीवनतारे

नागपूर ः लक्षणे नसल्याने गृहविलगीकरणात असलेल्या एका युवकाने नियम न पाळता नागपूर व गोंदियात सर्रास फिरस्ती केली. त्याच्या संपर्कातील तब्बल १० जणांना कोरोनाची बाधा झाली. इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असल्याने त्याचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. मात्र, दहा दिवसांनंतरही या युवकाच्या नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला नाही. 

युवक नंदनवन येथील रहिवासी (वय २८) आहे. पुणे येथे एका कंपनीत तो कार्यरत आहे. तो महिनाभरापूर्वी इंग्लंडला गेला होता. २९ नोव्हेंबरला नागपुरात परतला. लक्षणे नसल्यामुळे गृहविलगीकरणात राहण्याची सूचना संबंधितांनी केली. मात्र, तो गोंदिया येथे कामासाठी गेला. यानंतर त्याने चाचणी केली. त्यात कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. 

युवकाच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी करण्यात आलीय त्यात घरातील ४ ते ५ सदस्य बाधित आढळून आले. गोंदियात त्याच्या संपर्कातील ३ ते ४ जण बाधित आढळले. त्याला बुधवारी मेडिकलमध्ये विशेष कक्षात दाखल करण्यात आले. नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे (एनआयव्ही) पाठविण्यात आले. मात्र, अद्याप अहवाल प्राप्त झाला नाही. 

मेडिकलमध्ये ‘थांबा’ 

मेडिकलमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित दाखल आहेत. यात भर म्हणून २३ डिसेंबर २०२० ते २ जानेवारी २०२१ या काळात ८ जण दाखल झाले आहेत. यातील ६ जण बाधित आहेत. तर दोघांनी कोरोनावर मात केली. मात्र, यानंतरही पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त झाला नाही. या युवकासह ८ जणांना मेडिकलमध्ये किती दिवस डॉक्टरांच्या निरीक्षणात थांबावे लागेल, 

यासंदर्भात विचारणा करण्याचा प्रयत्न केला; मात्र येथे संपर्क होऊ शकला नाही. विशेष असे की, इंग्लंडहून नागपुरात परतलेली एक व्यक्ती घरीच राहते. आरटीपीसीआर चाचणीचा अहवालही दोन दिवस उशिरा आल्यानंतरही त्याचे ट्रेसिंग आणि मेडिकल पोहोचेपर्यंत त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केले जोते.


संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

'Gautam Gambhir मला देशद्रोही म्हटलं अन् अपशब्दही वापरले... ', विश्वविजेत्या भारतीय खेळाडूचा खळबजनक आरोप

Civic Scam: पुणे महापालिकेतील बोगस भरती घोटाळा उघड: ३० लाखांच्या डीलचा व्हिडिओ समोर, शेकडो तरुणांची फसवणूक

Indapur Crime : तरंगवाडी येथे अनैतिक संबंधांच्या संशयातून लोखंडी रॉडने वार करून 54 वर्षीय व्यक्तीचा खून; दोघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

Karad Silver-Cash Seizure: कऱ्हाडमध्ये ट्रॅव्हल्स वाहनातून १५० किलो चांदी व ४० लाखांची रोकड जप्त; पोलिस व आयकर विभागाची पडताळणी सुरू

SCROLL FOR NEXT